संसद नव्हे, संविधानच सर्वोच्च...!!!

संसद नव्हे, संविधानच सर्वोच्च...!!! भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध अत्यंत विखारी अशी गरळ ओकली आहे. ते संविधानातील अनुच्छेद 142 ला न्यायालयाच्या हातातील आण्विक शस्त्र असे संबोधून संविधान निर्मात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच अप्रत्यक्षपणे अपमान करीत आहेत असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. त्यापाठोपाठ भाजपचे प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले खासदार निशिकांत दुबे यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यावर देशात धार्मिक दंगली माजविण्यास कारणीभूत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. या दोघांच्या पाठोपाठ रा. स्व. संघ-भाजपच्या समाज माध्यमावरील ट्रोलसेनेने संसद हीच सर्वोच्च आहे, संसदेला काहीही करण्याचा अधिकार आहे, सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीला निर्देश देऊ शकत नाही, संसदेने केलेल्या कायद्याची किंवा संविधानाच्या दुरुस्तीची समीक्षा करण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाला नाही अशा प्रकारचा संविधान विरोधी गदारोळ माजविला आहे. ज्यांना भारतीय संविधांनाचा प्राथमिक अभ्यास आहे अशा कोणत्याह...