स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...!!!
स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!!! (कधीच, कुठेही पुढे न आलेली बाजू) आजही आपल्या अवतीभोवती अशी बरीच मंडळी आहे की माहितीचा अभाव किंव अवेअरनेस नसल्यामुळे गुंतवणूकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय निवडत नाहीत. शेअर बाजाराबद्दल सुस्पष्ट माहिती उपलब्ध असतानाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी धाडस होत नाही. पण जवळपास 107 वर्षांपुर्वी एका मराठी माणसाने स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी स्थापन केली होती. ज्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढन्यासाठी 2021 उजाडावं लागलं त्याच स्टॉक मार्केटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 107 वर्षांपुर्वी पाऊल ठेवलं होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु आहेत. एकाच आयुष्यात त्यांनी फार वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. ज्या भूमिका आज सुद्धा आदर्श मानल्या जातात. ते एक उत्तम वक्ते होते, राजनेता होते, पत्रकार, संपादक, लेखक, संशोधक, समाजसुधारक होते, पण आज त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका पैलुबद्दल आपण बोलतोय. तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गुंतवणूक. 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारता...