डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा RSS बद्दलचा विरोध...व त्याची ऐतिहासिक कारणे, वास्तव आणी दृष्टिकोन...!!!

1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!"- @ प्रा.हरी नरके सर... संघाचे सगळे दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी श्री. राजीव तुली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संघाच्या जवळकीचे दि प्रिंटमध्ये २३ एप्रिल २०२० रोजी केलेले सर्व दावे कपोलकल्पित, निराधार आणि बनावट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर.एस.एस. हा तर विषवृक्ष आहे! ते पुढे असेही म्हणतात की, हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे! काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाला जवळ करणेच शक्य नाही. ठेंगडींची नियुक्ती ह्या निव्वळ हवेतल्या बाता- १. तुलींनी दावा केला आहे की संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी म्हणून डॉ. आंबेडकरांनी नियुक्ती केली होती. तुली यांचा असाही दावा आहे की ठेंगडी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी १९५४ मध्ये भंडारा पोटनिवडणुकीत त्यांना आपला निवडणूक प्रतिनिधी नेमले होते. असेच दावे याआधी अरूण आनंद यांनी केले होते. ते मी पुराव्यानिशी फेटाळले होते. प...