डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा.. !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा.. !!लोकसत्ता ऑनलाइन | April 14, 2018 05:06 am भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यातून अनेक अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली. या ग्रंथसंपदेतूनच त्यांची सर्वसमावेशक आणि समन्यायी अशी वैचारीक भूमिका स्वयंस्पष्ट होते. त्यांच्या ग्रंथांचा संक्षिप्त आढावा या लेखात घेण्यात आला आहे... Administration and Finance of the East India Company (ईस्ट इंडिया कंपनी प्रशासक आणि अर्थनीती) – डॉ. बाबासाहेबांनी अॅॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी हा शोधनिबंध, एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५ मध्ये सादर केला होता. हा केवळ ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांची बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. हे बदल भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे...