घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !!
1】 घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !!
घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !"
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.
३) डी.पी.खेतान.
४) कृष्णास्वामी अय्यर.
५) बी. एल. मित्तल.
६) के. एम.मुन्शी.
७) सय्यद अहमद अब्दुल्ला.
हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३७९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत-पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता आणि उरले ते फक्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले.
संविधान निर्मिती करिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा (प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते.मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली...
अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथाचा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण बाबासाहेब आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्याना.. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही...
"भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन.. "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच !" असे सांगून सर्व-सामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे, घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत..
पुरावा क्र. १
मसुदा समितीचे एक सभासद टी.टी.कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला. त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चवथे सभासद संस्थानिकां संबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते ही उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ.आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."
पुरावा क्र. २
घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.. ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
पुरावा क्र. ३
घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा.....
-लेख अमोल गायकवाड....✍
【Ref : डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन】
-----------------------------------------------------------------------------------------------------------
2】 भारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का? – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल.. !!
भारतीय राज्यघटना – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या vision चं दिमाखदार product.
२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच.
पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.
Quora वर देखील हा प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ awesome आहेत.
पाहिलं उत्तर आहे तेजस्विता आपटे हिचं.
ती म्हणते :
ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.
तुम्हाला काय वाटतं – घटना निर्माण करणारे – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे मूर्ख असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?
तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?
तुम्हाला खरंच असं वाटतं का की जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?
समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.
प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी modify केली गेली, त्यानुसारच accept केली गेली.
कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.
थोडीशी कल्पना हवी असेल तर एक fact सांगते – आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे – १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी suitable नसेल तर काय होतं.
===
सणसणीत !
पुढे, अनुप कुंभारीकरने अगदी वेगळ्याप्रकारे उत्तर दिलंय :
चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.
होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/
आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.
ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे :
“It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.
One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…
As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration.
— 4th Nov 1948, Constituent Assembly
घटनाकार आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय :
“I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.”
मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.
आपल्याला “great” राज्यघटना मिळाली आहे.
बास…! बोलती बंद…!
Well done तेजस्विता आणि अनुप…!
जेव्हा कुणी राज्यघटनेवर “कॉपी” केलेली असल्याचा आरोप करेल – तेव्हा ही उत्तरं द्या....
-Article by-Omkar Dabhadkar...✍️
२६ जानेवारी २०१७
ईनमराठी. कॉम
【Ref: https://www.inmarathi.com/is-indian-constitution-copied-the-answer-will-make-you-proud/】
--------------------------------------------------------------------------------------------
----------
3】भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर दोन वर्षे चर्चा झाली,अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 17 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा अंतिम मसुदा घटना समिती समोर सादर केला,ही राज्यघटना संमत करण्यासाठी त्यावर ठराव मांडण्यात आला,आणि या ठरावावर बोलण्यासाठी सत्तर पेक्षा जास्त नावं अध्यक्षांकडे आली, यातील बऱ्याच जणांनी भाषणे केली,घटनेबद्दल आपले विचार मांडले,त्यातील काही सदस्यांचे विचार येथे देत आहे,म्हणजे बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार होते की नाही? अशी चर्चा करणाऱ्या बऱ्याच उपटसुंभ लोकांना कळेल...
1- फ्रँक अँथनी:- हा एवढा प्रचंड न किचकट दस्तावेज तयार करण्यासाठी किती प्रचंड श्रम व मनाची एकाग्रता लागली असेल याची आपणापैकी कुणालाही कल्पना येऊ शकेल असे मला मुळीच वाटत नाही, त्यांची विषयावरील प्रचंड पकड, निव्वळ मूलभूत तत्त्वांवरील नव्हे तर बारकाव्याबदलदेखील. आणि या सर्वाचे स्पष्टीकरण सुटसुटीतपणे करून स्वतःची बाजू मांडणारे त्यांचे भाषण ऐकताना मला नेहमीच अत्यानंद वाटत असे. (CAD, Vol. XI, 25-11-49, P. 938-39)
2- डॉ. पट्टाभिसीतारामय्या: आपले मित्र डॉ.आंबेडकर बाहेर गेलेले आहेत. तथापि मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हे जे अप्रतिम व प्रचंड असे काम त्यांनी केले, त्याकरिता रस्ता गुळगुळीत करण्यासाठी लागणाऱ्या वाफेच्या इंजिनाची शक्ती असलेली बुद्धिमत्ता त्यांनी वापरावी. कुणालाही न जुमानणारी, दडपणाला बळी न पडणारी, अजिंक्य अशी त्यांची बुद्धिमत्ता "पाम" वृक्षाप्रमाणे उंच दिग्गज असोत की खुरटी झुडुपे असोत, त्या सर्वांचे ती दमन करीत असते . त्यांना जे योग्य वाटेल त्याकरिता ते परिणामांची पर्वा न करता उभे राहतात” ( फुले - आंबेडकर संशोधनातील प्रदूषणे,वसंत मून, पृ . ४४ )
3- ओ.व्ही.आलगेसन ( मद्रासचे सदस्य ) : ' The Drafing Committee and all those who have connected with its labours have been rightly congratulated and we are sure to miss the stentorian voice of Dr. Ambedkar explaining in a crystal clear manner the provisions of the constitution. ( CAD , Vol. XI , 24-11-1949 , P. 901)
4- महावीर त्यागी:- A concrete picture is before us. Dr. Ambedkar who was the main artist has laid aside his brush and unveiled the picture for the public to see and comment upon.'( फुले-आंबेडकर संशोधनातील प्रदूषणे,वसंत मुन,पृष्ठ ४४)
5- जसपतराय कपूर:- (उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी) : पूर्वी माझ्या मनात आंबेडकरांबद्दल बराच पूर्वग्रह होता. म.गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर उपोषण केले होते,त्यावेळी बोलावणे पाठवूनही आंबेडकरांनी म्हटले की, मला महत्त्वाचे काम आहे,व ते तीन दिवसपर्यंत त्यांना भेटले नाहीत.त्या घटनेमुळे माझ्या मनात आंबेडकरांबद्दल अढी निर्माण झाली होती,परंतु गेल्या तीन वर्षांपासून आंबेडकरांनी रात्रंदिवस जे महान कार्य केले, जे राष्ट्रीय दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे, त्यावरून माझ्या मनातील संदेह तर नष्ट झालाच परंतु आदरही निर्माण झाला. माझ्या मनातील सर्व शंका नष्ट झाल्या आणि माझ्या मते आज भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रभक्तांत त्यांची गणना करायला हवी. अनेकदा काही महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसे,अशा वेळी आंबेडकर हे उपयुक्त व व्यवहारी सूचना करीत. त्यामुळे प्रश्न तात्काळ सुटत असे.(CAD,vol-XI,23-11-1949 P. 788)
6- अल्लादि कृष्णस्वामी अय्यर (जगप्रसिद्ध घटनापंडित) :- माझे मित्र माननीय डॉ.आंबेडकर यांनी या घटनेचा आराखडा आणि मसुदा समितीचा शिलेदार म्हणून काम केलेल्या अथक कार्याबद्दल मी त्यांचे कौतुक केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात अपयशी ठरेल असं मला वाटते (CAD,vol-XI,23-11-1949 P. 826)
7- रणधीर बसू मटारी( आसामचे प्रतिनिधी):- my tribute to Dr. Ambedkar and the drafting committee for their great achievement in producing his Constitution.(CAD,vol-XI,24-11-1949 P. 867)
8- श्यामनंदन सहाय (बिहारचे प्रतिनिधी):-हा प्रसंग भारताच्या इतिहासात एकमेव आहे.कारण यापूर्वी कधीही लोकप्रतिनिधींनी स्वत: करिता कायदा तयार केला नव्हता. या घटनेत बऱ्याच सुधारणा होतील. परंतु या घटनेतील गाभा पुन्हा कधीही निर्माण करता येणार नाही, महात्माजींनी स्वातंत्र्य दिले, तर त्यांचे कठोर टीकाकार डॉ . आंबेडकर यांनी भारताची घटना तयार करण्याचे काम केले. निव्वळ घटना समितीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र त्यांचे ऋणी राहील. ज्या समर्थपणे त्यांनी मसुदा तयार केला तितक्याच समर्थपणे आंबेडकरांनी घटना समितीमार्फत तो मान्य करून घेतला,हे त्यांचे कौशल्य वर्तमानकाळच नव्हे तर भावी काळदेखील कृतज्ञपणे लक्षात ठेवील.(CAD,vol-XI,22-11-1949 P.788)
9- एस. नागप्पा (मद्रास):- सर्वप्रथम डॉ.आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन केलेल्या अत्यंत उपयोगी आणि देशभक्तीपर कार्याबद्दल मी त्यांचे कौतुक कारतो.मी त्यांना या देशातील सर्वोत्कृष्ट देशभक्त समजतो. मी त्यांना नेहमी कोणत्याही विषयावर विधायक दृष्टिकोन आणताना पाहिलं आहे, बर्याच प्रसंगी त्यांनी आलेल्या अडथळ्यांचे निराकरण केले आहे.(CAD,vol-XI,21-11-1949 P. 758)
10- मेहबूब अली बेग (मद्रास):- डॉ. आंबेडकर यांचे स्पष्टीकरण आणि विचार स्पष्ट व एकमेवाद्वितीय असे होते, त्यांचे घटनात्मक प्रश्नांसोबतच अर्थशास्त्रावरील प्रभुत्व अप्रतिम,परिपूर्ण व एकमेव असे होते, परंतु आंबेडकरही पूर्णत: स्वतंत्र नव्हते,म्हणून जर घटनेमध्ये काही दोष राहिले असतील तर त्याबद्दल त्यांना व्यक्तिशः दोष देता येणार नाही.(CAD,vol-XI,21-11-1949 P. 742)
11- आर.व्ही.तुळेकर :- भीमराव आंबेडकर यांनी एक महान पांडव भीम यांच्या नावाला लायक असे महान कार्य केले आहे. त्यांनी त्यांच्या भीमराव या नावाला नक्कीच न्याय दिला आहे,आणि त्यांनी दृष्टी स्पष्टता,विचारांची स्पष्टता आणि भाषेच्या स्पष्टतेसह हे कार्य केले आहे.(CAD,vol-XI,22-11-1949 P. 826)
12- शंकरराव देव:- डॉ. आंबेडकर आणि त्यांचे संबंधित किंवा मसुदा समितीचे सहकारी कृतज्ञतेस पात्र आहेत आणि मला असे वाटते की, ते जगातील कोणत्याही देशातील कोणतीही घटना बनविण्यात आणि मसुद्या बनविण्याच्या तुलनेत उभे राहू शकतात. (CAD,vol-XI,21-11-1949 P. 730)
13- व्ही.आय.मुनिस्वामी पिल्ले:- I must say a word of praise to the caliber and capacity of the chairman of the Drafting Committee. B. R. Ambedkar (loud cheers). I feel proud that his capacity has now been recognized, not only by the Harijans but by all communities that inhabit India. I know Sir, that he has served the community of the Harijans and also of India by his great service and sacrifice in preparing a constitution which will be the order of the day from 26th Jan.1950.(CAD, P. 608)
【Ref: Note:- CAD (Constituent Assembly Debates】
-अरविंद वाघमारे...✍️
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
4】 डॉ बाबासाहेब आंबडेकर मसुदा समितीचे अध्यक्ष कसे बनले याचे सर्वात सोपे लॉजिकल उत्तर. यासाठी खाली दिलेल्या बाबासाहेबांच्या शिक्षणाइतके शिक्षण असलेला तेव्हा जगात दुसरा कुठला माणूस होता दाखवा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण -B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,D.Litt., Barrister-at-Law.B.A.(Bombay University)**Bachelor of Arts, MA.(Columbia university) Master Of Arts,M.Sc.( London School of Economics) Master Of Science, Ph.D. (Columbia University),Doctor of philosophy ,D.Sc.( London School of (Economics) Doctor of Science L.L.D.(Columbia University) Doctor of Laws , D.Litt.( Osmania University) Doctor of Literature,Barrister-at-La (Gray's Inn, London) Law qualification for a lawyer in royal court of England. Elementary Education,1902Satara, Maharashtra Matriculation, 1907,Elphinstone High School, Bombay Persian etc., Inter 1909,Elphinston e College,Bombay Persian and English B.A, 1912 Jan, Elphinstone College, Bombay,University of Bombay,Economics & Political Science M.A 2-6-1915 Faculty of Political Science,Columbia University, New York, Main-Economics Ancillaries-Soc iology, History Philosophy, Anthropology, Politics Ph.D 1917 Faculty of Political Science, Columbia University, New York, The National Divident ofIndia – A Historical and Analytical Study' M.Sc 1921 June London School of Economics, London 'Provincial Decentralizatio n of Imperial Finance in British India' Barrister-at- Law 30-9-1920 Gray's Inn,London Law D.Sc 1923 Nov London School, of Economics, London 'TheProblem of the Rupee - Its origin and it's, solution' was accepted for the degree of D.Sc. (Economics). L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For HIS achievements, Leadership and authoring the constitution of India D.Litt (Honoris Causa)12-1-1953 Osmania University.आता बोला.
-धन्यवाद डॉ आशिष तांबे.....✍️
Comments
Post a Comment