डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा RSS बद्दलचा विरोध...व त्याची ऐतिहासिक कारणे, वास्तव आणी दृष्टिकोन...!!!
1] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपुलकी होती का...? प्रविण सिंधू, बीबीसी मराठी 7 जानेवारी 2025 "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली. त्यावेळी आंबेडकरांनी केलेल्या भाषणात म्हटलं की, संघाशी मतभेद असले, तरी त्यांच्याकडं आपलेपणानं पाहतो", असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमधील बंधुता परिषदेत केला... याबाबत संघाची माध्यम शाखा असलेल्या विश्व संवाद केंद्राने एक वृत्तही प्रसारित केलं...यानंतर या दाव्याविषयी वादविवादाला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नसल्याने संघ ओढून ताणून आंबेडकरांशी नातं जोडू पाहत आहे, असा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही संघाचे हे दावे फेटाळले आहेत.. या पार्श्वभूमीवर संघाने जसा दावा केला आहे, त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांना खरंच संघाविषयी आपुलकी होती का? संघ कोणते पुरावे देत आहे? त्यावर डॉ. आंबेडकरांच्या साहित्याच्या...