Posts

स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...!!!

Image
स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!!! (कधीच, कुठेही पुढे न आलेली बाजू) आजही आपल्या अवतीभोवती अशी बरीच मंडळी आहे की माहितीचा अभाव किंव अवेअरनेस नसल्यामुळे गुंतवणूकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय निवडत नाहीत. शेअर बाजाराबद्दल सुस्पष्ट माहिती उपलब्ध असतानाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी धाडस होत नाही. पण जवळपास 107 वर्षांपुर्वी एका मराठी माणसाने स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी स्थापन केली होती.  ज्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढन्यासाठी 2021 उजाडावं लागलं त्याच स्टॉक मार्केटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 107 वर्षांपुर्वी पाऊल ठेवलं होतं.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु आहेत. एकाच आयुष्यात त्यांनी फार वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. ज्या भूमिका आज सुद्धा आदर्श मानल्या जातात. ते एक उत्तम वक्ते होते, राजनेता होते, पत्रकार, संपादक, लेखक, संशोधक, समाजसुधारक होते, पण आज त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका पैलुबद्दल आपण बोलतोय. तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गुंतवणूक. 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारता...

SC आरक्षण उपवर्गीकरणावर बौद्धांची भूमिका...!

Image
  1]  SC आरक्षण उपवर्गीकरणावर बौद्धांची भूमिका...! A) 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली. इम्पिरिकल डेटा च्या आधारे राज्याला आवश्यकता वाटली तर ते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू शकते. असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी माजी न्यायधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी एक कमिटी गठीत केली, ज्याची मुदत या महिन्यात अर्थात सप्टेंबर 2025 ला संपत होती. तिला परत सहा महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. B) ब्रिटिशांनी 1872 ला पहिली जनगणना केली. 1911 ला अस्पृश्य जातींच्या समूहाची पहिल्यांदा जनगणना झाली. 1911 च्या जनगणनेत अस्पृश्य लोक ओळखण्यासाठी खालील दहा निकष वापरले गेले: 1. ब्राह्मणांची श्रेष्ठता नाकारणे: या लोकांना ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व किंवा वरचे स्थान मान्य नव्हते. 2. गुरु कडून मंत्र न घेणे: हे लोक ब्राह्मण किंवा इतर मान्यताप्...

आरक्षण वर्गीकरण : आरक्षण नष्ट करण्याचे कारस्थान...!!!

Image
1] आरक्षण वर्गीकरण : आरक्षण नष्ट करण्याचे कारस्थान भाग -१    आरक्षण किंवा सामाजिक व शैक्षणिक मागास समूहांना नोकऱ्या व शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या राखीव जागा हा स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात सदैव धगधगत असलेला सर्वात विवाद्य मुद्दा ठरला आहे. एकीकडे आरक्षणाचे विरोधक आरक्षणामुळे त्यांच्या वाट्याचे लाभ अपात्र समूहांना वाटले जात आहेत म्हणून ओरड करीत असतात.दुसरीकडे आरक्षित जागांचे लाभार्थी समूह व या समूहाच्या अंतर्गत, परीघावर किंवा परिघाबाहेर असलेले गट आमच्या वाट्याला पुरेसे लाभ येत नाहीत आम्हालाही आरक्षण द्या असे म्हणून ओरड करीत असतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओरड करणारे आरक्षणाचे विरोधक किंवा वर्गीकरणवादी समर्थक या दोन्ही गटांचा आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आरक्षण म्हणजे भौतिक लाभ मिळविण्याचे साधन अशा प्रकारचा आहे. जेथे भौतिक लाभासाठीचा पाशवी स्वरूपाचा संघर्ष उभा राहतो तेथे नैतिकता,तत्वज्ञान,मूळ संकल्पना व दूरगामी परिणाम या मूल्यांना काहीही महत्व उरत नाही. यामुळे मूळ संकल्पना समजून घेऊन मुद्द्यांवर एकमत घडवून सामोपचाराने तोडगा काढण्यास कोणताही गट तयार होत नाही.प्रत्येक गट आ...

बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी अ‍ॅड.बी.सी.कांबळे...व त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान...!!!

Image
1] बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी.सी.कांबळे...!!! उद्या (दि. १५) रिपब्लिकन नेते अ‍ॅड . बी. सी. उर्फ बापूसाहेब कांबळे यांची जन्मशताब्दी आहे. संपादक, वक्ता, संसदपटू, घटनातज्ज्ञ, बाबासाहेबांचे चरित्रकार व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार असणाऱ्या कांबळे यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... १९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ साली पुणे येथे 'पुणे करार रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच इतिहासात 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात तीन सत्याग्रह केले. त्यातील पहिला होता १९२७ सालचा महाडचा सत्याग्रह. पाण्यासाठी केलेला हा सत्याग्रह मूलभूत मानवी हक्कांसाठी होता. दुसरा सत्याग्रह म्हणजे १९३० ते ३५ सालापर्यंत केलेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हा समाज धार्मिक हक्कांसाठी होता. तिसरा व शेवटचा सत्याग्रह 'पुणे करार रद्द कर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा RSS बद्दलचा विरोध...व त्याची ऐतिहासिक कारणे, वास्तव आणी दृष्टिकोन...!!!

Image
1] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपुलकी होती का...? प्रविण सिंधू, बीबीसी मराठी 7 जानेवारी 2025 "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली. त्यावेळी आंबेडकरांनी केलेल्या भाषणात म्हटलं की, संघाशी मतभेद असले, तरी त्यांच्याकडं आपलेपणानं पाहतो", असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह विजय जोशी यांनी कराडमधील बंधुता परिषदेत केला... याबाबत संघाची माध्यम शाखा असलेल्या विश्व संवाद केंद्राने एक वृत्तही प्रसारित केलं...यानंतर या दाव्याविषयी वादविवादाला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकरांशिवाय राजकारण करणं शक्य नसल्याने संघ ओढून ताणून आंबेडकरांशी नातं जोडू पाहत आहे, असा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही संघाचे हे दावे फेटाळले आहेत.. या पार्श्वभूमीवर संघाने जसा दावा केला आहे, त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांना खरंच संघाविषयी आपुलकी होती का? संघ कोणते पुरावे देत आहे? त्यावर डॉ. आंबेडकरांच्या साहित्याच्या...