बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार...!!!

१】 कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाशी मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे, पण हे त्याचे म्हणणे मला पटण्यासारखे नाही.....मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजे सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या परस्परविरोधी गोष्टी आहेत. (truth and authority are inconsistent) शास्त्र सुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णत: (finality) मान्य करीत नाही. म्हणून सत्य सुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन: पुन्हा शोध करणे प्राप्त असते. म्हणून जगामध्ये पूर्णत: पवित्र असे काहीच नाही.....
-विश्वरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर...✍📚

[ Ref: 20 जून 1946 सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय मुंबई नवयुग : 13 एप्रिल 1947 ]

------------------------------------------------------------------------

२】बुद्ध की मार्क्स...!

"बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सचा तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक अढळत नाही. याचाच अर्थ असा की मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हा ही नवीन नाही. तेव्हा जीवनाचा मुलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची गरज नाही. बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तमप्रकारे प्रस्थापित करुन ठेवलेला आहे. आणि तो त्याने आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केलेला आहे. हे प्रवचन बौद्ध वाड्मयात "धम्मचक्रप्रवर्तन सुत्त" या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सचा पगडा बसलेला आहे, त्यांना मला हेच सांगायचे आहे की, तुम्ही धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताचा अभ्यास करा व बुद्धाने काय म्हटले आहे ते समजून घ्या. मला खात्री आहे की, तुम्हाला त्यात मानवी जीवन संग्रामाचे उत्तर निश्चितच आढळेल."

-विश्वरत्न.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर...✍📚

【Ref: जागतिक बौध्द परिषद,२० नोव्हें१९५६,काठमांडू 】

-----------------------------------------------------------------------

३】कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्या मधील तुलना विनोद म्हणून ही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माक्र्स व बुद्ध यांच्या २३८१ वर्षाचे अंतर आहे. बुद्ध इ. स. पूर्व ५६३ मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इ. स. १८१८ मध्ये कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाचा नव्या राज्य व्यवस्थेचा एका नव्या अर्थ शास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्य शास्त्राशी वा अर्थ शास्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक, यापेक्षा आणखी कोणीही नाही, असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचार क्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वां मधील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’’ हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे.....

मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा करतील. माक्र्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन! मार्क्सवादी म्हणतील की - बुद्धाची त्यांच्या गुरूशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रम प्राप्त आहे. अशा दोन व्यक्तींमध्ये कसली तुलना होऊ शकणार मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार? बुद्ध काय शिकवू शकणार? काहीही असो, या दोघां मधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोघांचे ही वाचन झाले असल्यामुळे व दोघांच्या तत्त्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्या वर येऊन पडते. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की, ते त्यांचा रोख बदलतील बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्याची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल. परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की, त्यांनी दखल घ्यावी असे, त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीतून काही तरी आहे, हे त्याच्या लक्षात येईल.....

-विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर...✍📚

【Ref: बुद्ध की कार्ल मार्क्स पेज नं 3...】

४】मी या बाबतीत कोणत्याही प्रकारे तडजोड करू इच्छित नाही. तुमच्याकडून मिळणाऱ्या कोणत्याही मान सन्मानापेक्षा मी माझ्या विचारांची अधिक काळजी घेतो मी स्वल्पविराम सुध्दा बदलणार नाही..... ''बुध्द आणि कार्ल मार्क्स यापैकी एकाची या पुढील पिढीला निवड करायची आहे......

-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर...✍📚

(1953 दिल्ली)

-------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!