डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय हे नाव का दिले..??

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाचं जवळच नातं...मिलींद महाविद्यालय आहे. तर मिलींद महाविद्यालय नाव  कसे पडले हे जाणून घेवू...


डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या महाविद्यालयाला मिलींद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक  बॅक्ट्रीयाचा ग्रिक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल गर्व होता.त्याला असे वाटत होते की, ग्रिक सारखे विद्दवान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. आपल्या बुध्दिमत्तेचा गर्व चढला होता.तो सर्वांना वादविवादाने आव्हाण देत असे.म्हणुण त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की, आपण एकदा बौध्द भिक्खु बरोबर  वादविवाद करावा. पण त्याचबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. तसा मिलींद काही फार तत्वज्ञानी नव्हता. किवा गाढ विद्वान ही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवायचा हे माहीत होते. आशा मिलींद बरोबर बुध्दीवाद करण्यास कोणीही तयार  होईना.याची बौध्दाना लाज वाटू लागली. व वाईटही वाटले.नंतर महाण प्रयासाने त्यांनी 'नागसेन' भिख्कुला तयार केले.मिलींदचे आव्हान आपण स्विकारले पाहिजे असा नागसेनाने निश्चित केला.मग त्याबाबत यश येवो अथवा अपयश येवो.     नागसेन हा ब्राम्हण होता. वयाच्या सातव्या वर्षे त्याने मात्यापित्याचे घर सोडले होते.त्यांने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्ती साठी अतिशय कष्ट घेतले.तो अत्यंत विद्वान होता. नागसेनाने भिख्कु चा आग्रह मान्य केला. नंतर मिलींद व नागसेन यांच्यात वाद झाला. त्यांचा वादविवाद खुप दिवस चालू होता.या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकाला पाली भाषेत "मिलींद पन्न" असे नाव आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर 'मिलींद प्रश्न' आहे . या पुस्तकाचे शिक्षकाने वाचन करावे. अशी माझी इच्छा आहे. या पुस्तकात शिक्षकाच्या अंगी काय गुण असावे . व विद्यार्थीचे काय गुण असावे हे गुण सांगितले आहे. म्हणून या महाविद्यालयाला मिलींद महाविद्यालय  व परिसराला नागसेन हे नाव दिले आहे. वादविवादात मिलींद हारला.त्याचा पराजय झाला.तो बुध्द धर्मी झाला. पण मिलींद हारला व बौध्द झाला म्हणून मी हे नाव या मी या महाविद्यालयाला हे नाव दिले नाही. तर मिलींद हा मला त्याच्या बौध्दीक प्रामाणिकपणाबद्दल प्रिय वाटतो.त्याचा हा आदर्श हा सर्वानी डोळ्यासमोर ठेवावा. म्हणून हे नाव दिले आहे. हे आदर्शभुत असेच आहे. असे माझे मत आहे. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मिलींद व उत्कृष्ट शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत.  शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी पैसा देणगी दिली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणे हे अनुचित होय.मी या संस्थेला पुष्कळ नुसकान सोसले आहे. पण कोणा व्यक्तीचे नाव दिले नाही. तसे मलासुद्धा आदर्श नाव आहे. पण मला मिलींद चा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मिलींद महाविद्यालय हे केवळ ज्ञान देणारे महाविद्यालय नाही. तर ते एक संस्कार केन्द्र आहे. यामधुन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊण बाहेर पडला पाहीजे......


-विश्वरत्न-डाँ.बाबासाहेब आबेडेकर....✍📚

【 Ref-१२ डिसेंबर१९५५ भाषण】

---------------------------------------------------------------------------

Comments

  1. तुषार मस्तच माहिती☺️👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!