डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!


1 】 माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो. हक्काचा मित्र असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. बाबासाहेब कोलंबियाहून परतले. चळवळीत पूर्णवेळ उतरण्याआधी त्यांनी स्वतःला एका चांगल्या वकिलाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आपली पूर्ण ताकद लावली. बाबासाहेब कित्येकदा सकाळी सात ला घरातून निघाले तर रात्री पार एक दोन वाजता घरी येत. अशातच त्यांना विधी महाविद्यालयात म्हणजे आजच्या जीएलसी (लॉ कॉलेज) ला व्याख्याता म्हणून काम करण्याचं निमंत्रण मिळालं. बाबासाहेबांनी ते स्विकारलं. कालांतराने ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले. पण हा किस्सा त्यांच्या व्याख्याते असण्याच्या कालखंडातला.
त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे लेक्चर म्हटलं की, बाहेरच्या अनेक कॉलेजेस मधून विद्यार्थी, प्राध्यापक जातीनं हजेरी लावत. त्यांच्या व्याख्यानांच्या नोट्सवर अनेकदा बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये आर्टिकल छापून येत. खूप मोलाचे डॉक्युमेंट होते ते. पण कुणीही सांभाळून न ठेवल्याने आता ते उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांना या व्याख्यानांचं बऱ्यापैकी मानधन मिळायचं. मानधन मिळालं की, बाबासाहेब ते आणून सरळ रमाईंच्या हातात देत असत. आता तेवढ्यावर रमाईचं मन भागत नव्हतं. साधी भोळी माई ती. एकदा बाबासाहेबांना तडक म्हणाली, साहेब, तुम्हाला घरादाराची काळजीच नाही. कधीतरी भाजीपाला आणून द्यावा.. मीच एकटी काय काय करणार…
बाबासाहेब म्हणाले.. हो रामू…
बाबासाहेबांना गोल्ड स्टँडर्डवर प्रबंध लिहायला सांगितला असता तर सोप्पं वाटलं असतं. पण आता भाजीपाला घेऊन जायचा म्हटलं तर त्यांना थोडंसं कठिण वाटू लागलं होतं. भायखळ्यांच्या ज्या भाजीमार्केट मध्ये त्यांचं रमाईसोबत लग्न झालं होतं त्या ठिकाणी गेले बाबासाहेब. अडतीस रुपयाचा भाजीपाला घेतला. एक छोटी मोळी बसेल एवढे बोंबील, कोथिंबीर, मेथी अन् इतर भाज्यांच्या पंधरा पंधरा जुड्या घेतल्या. बरीच फळं पण घेतली. स्वारी खुश होती. आज रामू पुन्हा टोकणार नाही हा विचार मनात डोकावूनच ते घरी निघाले.
बीडीडी चाळीतल्या घरात येताच बाबासाहेबांच्या हातातलं सामान पाहून रमाई जी वैतागली त्याला तोड नव्हती. बाबासाहेब म्हणाले, मी महिनाभर पुरेल इतकं सामान आणलंय, आता तरी खुश…
रमाई म्हणाली.. ते बोंबील आता तीनेक दिवसात खराब होतील. ह्या भाज्या उद्यापर्यंत खराब होतील. हे असलं रोज थोडं थोडं आणायचं असतं. तरी रमाईनं हिशोब विचारलाच… किती पैसे झाले.. बाबासाहेब उत्तरले अडतीस रुपये.. पुन्हा रमाई चक्रावली.. म्हणाली.. पंचवीस रुपयाच्या जिन्नसा तुम्हाला महागात विकल्या. यानंतर परत बाजारहाट करायचा नाही तुम्ही.
थोडा वेळ असाच गेला.. बाबासाहेब स्वतः बसले रमाईसोबत. भाज्या विलग केल्या. बोंबील ही जुडीने बांधले. स्वतःपुरते ठेवले. आणि बाकीचे पोयबावाडीतल्या शेजाऱ्यांना वाटले.
स्वतः भाजी खुडून देणाऱ्या बाबासाहेबांना नंतर रमाईनं कधीच परत असल्या कामांसाठी तगादा लावला नाही. ती मनोमन खुश होती. अन् बाबासाहेबही.
त्या दोघांमधल्या प्रेमाचं नातं भलतंच विलक्षण होतं.

संदर्भासाठी कीर लिखित आणि खैरमोडे लिखित खंड चाळता येतील.

-वैभव छाया
‪#‎ThanksAmbedkar
------------------------------------------------------------------------------------------


2】 औरंगाबादचं मिलिंद कॉलेज... !!

मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर. मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. बाबासाहेब जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये दाखल होत तेव्हा त्यांचा मुक्काम रेल्वे हॉटेल ला ठरलेला असायचा. हे तेच रेल्वे हॉटेल जे कालांतराने हॉटेल अशोका म्हणून ओळखलं जायचं.

मिलिंद कॉलेजच्या स्थापनेपासून त्याच्या उभारणीपर्यंत माई आंबेडकर त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या. बाबासाहेबांना काही हवं नको पाहण्यासाठी माईसाहेबांचे धाकटे बंधू बाळू कबीरही सोबतीला होते. त्या काळात दिलीप कुमार लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या एकमागोमाग आलेले अनेक चित्रपट भयंकर गाजले होते. बाबासाहेबांच्या मुक्कामाच्या वेळेसच नेमकं दिलीप कुमार सुद्धा औरंगाबादलाच सेम हॉटेल मध्ये मुक्कामाला होते.
बाळू कबीरांकरवी दिलीप कुमार यांना ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबले असल्याचे कळाले. त्यांनीच दिलीपकुमार आणि बाबासाहेबांची भेट घडवून आणली. प्रायमरी इंट्रोडक्शन बाळू कबीरांनीच करून दिलं. बाबासाहेबांनीही आपुलकी दाखवत दिलीप कुमार यांचं स्वागत केलं. त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. राजकारण ते सिनेमा असं बरंच काही बाही. नंतर विषय आला तो मिलिंद कॉलेजचा. दिलीप कुमार यांनी मिलिंद कॉलेजसाठी भरभक्कम देणगी देण्याचा प्रस्ताव बाबासाहेबांपुढे ठेवला. बाबासाहेब शांतपणे ऐकत होते. आणि त्यांच्या प्रस्तावावर छोटंसं स्मित करून पुन्हा शांत झाले. दिलीप कुमार यांनी पुन्हा देणगीचा प्रस्ताव समोर ठेवला आणि मिलिंद कॉलेजच्या प्रवेशद्वाराला स्वतःचे नाव देण्याची अटही ठेवली.
आता बाबासाहेब मात्र चिडले. त्यांनी दिलीपकुमार खड्या शब्दात सुनावत म्हटले की, सिनेसृष्टीतील लोकांकडे कॅरेक्टर नामक गोष्टच नसते हे पुन्हा खात्रीशीर पटले. बराच संवाद झाला होता तो. प्रचंड झापून दिलीपकुमार आणि त्याने देऊ केलेले पैसे परतवले होते बाबासाहेबांनी. दिलीपकुमार तेथून निघून गेले.
झाल्या प्रकारावर बोलताना बाळू कबीर म्हणाले,
“या नटाकडे लाखो रुपये आहेत. आपण ज्या शिक्षण संस्था चालवतो त्यांना सध्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. आपण त्याच्याशी सलगीने वागला असता आणि त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला हजारो रुपयें दान सहज दिले असते.
मेव्हण्याच्या शब्दांनी क्रोधित झालेल्या बाबासाहेबांनी बाळू कबीरांना स्पष्ट सुनावलं की,
“काय म्हणतोस? मूर्ख आहेस तू. ज्या लोकांनी आपल्या शील, चारित्र्याचे प्रदर्शन मांडून धनदौलत कमावली आहे अशा लोकांकडून मी कधीच पैशांची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही. ज्यांनी अनीतीच्या आणि भ्रष्ट मार्गाने धनदौलत जमवली आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर ज्ञान दानासारखे पवित्र कार्य मी कधीही करणार नाही. मग माझ्या संस्था मेल्या तरी बेहतर!
थोडक्यात काय तर… पैशाचं दान देणाऱ्याचं इंटेशन महत्त्वाचं असतं.. त्यानं देऊ केलेली रक्कम ही क्षुल्लक असते. सरकारनं 125 कोटी रुपये दिल्यानं सरकार हे अतिशय संविधानवादी आहे असं माननणाऱ्या डीक्कीच्या उद्योजकांनी सदर प्रसंग जरूर वाचावा. आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. आणि जमलंच तर नैतिकतेचा पाठ घालून देणाऱ्या बाबासाहेबांचं आभार ही मानावं. कारण आज मिलिंद कॉलेज कोणत्याही मदतीविना ताठ मानेनं उभं आहे. अन् या महाविद्यालयाने भारताला एकापेक्षा एक महान लोकं दिलीयेत. त्यांच्याबद्दलही लिहीनच सावकाश.. तूर्तास इथंच थांबतो.

-वैभव छाया .✍️

‪#‎ThanksAmbedkar
सदर घटनेच्या संदर्भासाठी माई आंबेडकर लिखित बाबासाहेबांच्या सहवासात हे पुस्तक चाळता येईल.
-----------------------------------------------------------------

3】 बाबासाहेब अव्वल दर्जाचे ब्रँड गुरू होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लोकांना काय अपील करेल आणि ते कसे साध्य केल्यास अपील होईल याची अतिशय सुक्ष्म जाण त्यांच्याठायी होती. जरा विस्तारानं पाहू. बाबासाहेबांनी चालवलेली वृत्तपत्रे- 1. मूकनायक :- ३१ जानेवारी १९२० 2. बहिष्कृत भारत :- ३ एप्रिल १९२७ 3. जनता :-१९३० 4. प्रबुद्ध भारत :- १९५६ बाबासाहेबांनी एकुण चार वृत्तपत्रांची स्थापना केली. शतकानुशतके मूक अवस्थेत जगणाऱ्या स्थितीला दर्शवण्यासाठी, ती अधोरेखित करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम नाव निवडलं ते मूकनायक... वंचित जगताचा नायक.. मूकनायक. त्यानंतर भारत ही संकल्पना मांडताना भारताच्या अंतर्गत वसणाऱ्या बहिष्कृत भारताची ओळख त्यांनी इथल्या पत्रकारितेला करून दिली. जसजसा वेळ गेला. बाबासाहेबांच्या चळवळीत अस्पृश्यांसोबत, ब्राह्मण व ब्राह्मणेतरांचा सहभाग वाढत गेला तेव्हा त्यांनी जनता नावाचे पत्र सुरू केले. पुढे याच जनता चे रुपांतर प्रबुद्ध भारत असे ठेवले. भारत एक राष्ट्र म्हणून इथल्या मागासवर्गीयांवर बिंबवण्याचे सर्वात मोठे क्रेडीट हे फक्त बाबासाहेबांकडे जाते. त्यासाठी त्यांनी निवडलेली नावं, त्यांचं ब्रँडिंग फार महत्त्वाची भूमिका निभावते. बाबासाहेबांनी चालवलेले राजकिय पक्ष-  बाबासाहेबांचे तीन राजकिय पक्ष होते. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. स्वतंत्र मजूर पक्षात सुरूवातीला जरी अस्पृश्यांचा भरणा असला तरी पक्षाचे नाव आणि त्यातील मजूरांच्या स्वतंत्र होण्यासंबंधीची ग्वाही आणि आवाहन फार मोठा रोल प्ले करत होते. स्वतंत्र मजूर पक्षाने कामगारांच्या आयुष्यात, त्यांच्या आंदोलनात आमूलाग्र बदल घडवून आणले होते. पुढे जाऊन शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. यात देशातील तमाम शेड्यूल कास्ट मधील जातींना राजकिय पटलावर एकत्र आणून त्यांना त्यांचे राजकिय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी पिन पॉईंट होईल असे नाव निवडले. शेड्यूल कास्ट फेडरेशन.. दोन आकडी खासदार आणि आमदार होते त्यावेळेस. काँग्रेसनंतर देशातला सगळ्यात मोठा पक्ष होता शेकाफे. त्यानंतर 1956 साली बुद्धाचा स्विकार करतेवेळी बाबासाहेबांनी जातीय समीकरणांसाठी बनवलेल्या पक्षाला स्वतः विसर्जित करण्याचं प्लानिंग केलं. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. यात आंतरराष्ट्रीय पटलावर राजकारण करणारा राजकिय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेबांची पुस्तकं, त्यांची शीर्षकं, त्यांनी लिहीलेली प्रकरणं, त्यांनी वापरलेल्या टर्मिनोलॉजी सारं काही अतिशय सुटसुटीत, स्पष्ट, सामान्य जनांना उच्चार करता येईल असेच होते. त्या नावांचा, संकल्पनांचा कुठेही वावगा अर्थ काढला जाणार नाही, त्याच्या उच्चार अपभ्रंश होणार नाही याची त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतलेली आढळते. त्यांच्या विचारसरणीत सर्वसमावेशकता होती. म्हणून स्वतः स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचं नाव त्यांनी जनतेला अर्पण केलं.. संस्थेचं नावं ठेवलं... दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी... आणि आपण...म्हणतो..  निळा भडक  टिळा कडक  जय भीम...  तुम्हीच सांगा काही चूकीचं बोलतोय का?


 #ThanksAmbedkar
---------------------------------------------------------------

4】बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट . त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत . पुस्तकांशिवाय अभ्यास कसा होणार म्हणुन त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता .ते दरोरज ग्रंथालयातजात तेथिल पुस्तके मिळवुन वाचीत . अभ्यास करत असत .जितका वेळ ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यत ते तेथेच वाचतबसत .वाचता वाचता त्याना भुकही लागे . तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे . भूक लागली म्हणजे गुपचुप कुणालाही नदिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे .एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले . ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले . नंतर ग्रंथपालाने त्याना जवळ बोलावले ग्रंथपाल त्यांना म्हणाला 'मिस्टर हे ग्रंथालय आहे' . ते समोरचे बोर्ड बघा समोरच्या भितिवरचा 'सुचनावजा बोर्ड होता तेथे काही खावु नये घाण करु नये स्वच्छता राखा !.बाबासाहेबांनी तो भितीवरचा फलक पाहिला वाचला आणी मान खाली घातली . हायेथला नियम तुम्ही मोडला आहे . अपराध केला आहे . तुम्हाला शिक्षा करावी लागेल समजलात ? "ग्रंथपालाने सांगितले" .'क्षमा करा'.यापुढे मी सुचनेचे पालन करीन .उपाशी राहुन वाचन करीन मग तर झाल . ? बाबासाहेब म्हणाले'अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही '. ग्रंथपाल'शिक्षा करा' पण 1विनंती आहे बाबासाहेब'कोणती 'ग्रंथपालाने विचारले,"माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करु नका . ग्रंथाशिवाय मी जगु शकत नाही".म्हणून या व्यतीरिक्त कोणतीही शिक्षा द्या .मी ती भोगायला तयार आहे .बाबासाहेबांनी सांगितलेग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातुन सुखावला.ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावुन गेला . म्हणाला ' मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासुन माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे' . मी तुमचे जेवन आणीत जाईन.गोऱ्या ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा एकुन बाबासाहेबांचे डोळे पाणावले . ते पुढे सरसावले आणी त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली . असा हा ग्रंथवेडा  बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणुस आपला आदर्श असावयास पाहिजे . नाही का ?

जय भिम !!!!!!

----------------------------------------------------


5】 बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे.....!!

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचंफॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते अशासाठी की त्या काळात अपटू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं.जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेबआंबेडकर. या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटूंबातील.बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणातगेलं. याउलट बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं.जातीव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातूनकमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलंहोतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालंनाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे.बाबासाहेबांना सिडनहम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनीरमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे.रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदीकेली. हा भाग वेगळा की त्या वेळी बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झालाहोता. तर बाबासाहेबांकडे उंची सुट होते.प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुटसाठी केलेली होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती.प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा खिसा,अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित रहावा म्हणून असलेला वेगळाखिसा अशी ठेवण असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास हीभारीच असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सुट हामला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुटहा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेलापांढऱ्या रंगाचा जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन्पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे असले तर उच्चदर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक वेगळं कलेक्शन होतंत्यांच्याकडे.बाबासाहेबांच्या चष्म्याची फ्रेम मला सर्वात जास्त स्टाईलिश आणि सेक्सीफ्रेम वाटते. इथं सेक्सी या शब्दावर आकांडतांडाव करण्यापेक्षा डोळ्यांवरघातलेला गॉगल किंवा इतर चष्मा हा तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक मादकबनवत असतो हे लक्षात घ्या. तर त्यांच्या चष्म्याच्या फ्रेम ह्या त्यांनीअनेकदा युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं कपाळ भव्यहोतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते. त्यांचे हात आणि हातांचीबोटंसुद्धा साधारण लांबीपेक्षा मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्येबुद्धाच्या शरिरातही होती. खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांडपांडित्याची असतात. त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मात्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे. फावल्यावेळेत ते लेहंगा किंवालुंगी नेसत. त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद कॉलेज, औरंगाबदमधला.आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्या खिशाला एकाच वेळेस सहा पेनअसत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे. तब्बलदोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन आवडायचे. त्यांची पेनपकडण्याची पद्धत सुद्धा अफाट होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनहीशाबूत आहेत. इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल असेवाटत नाही. बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे. तसंचत्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार सुंदर होतं.बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल आणिशर्टाला असलेली बटणं आणि पुढचं घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुपबारकाईने लक्ष ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनीवापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. आज अनेकठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे आपल्याला पहायला मिळतात.मी मघाशीच म्हटलं की त्यांना हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्याहॅट वापरल्या, काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेचकाळ्या चष्म्यांच्या बाबतीतहीतीच गत होती. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्यारंगाच्या सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा चॉईससुद्धाभन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायलासुरूवात केली. पण त्यांच्या काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनहीतसंच स्टाईलिश होतं.बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी पैसे घेऊनसुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे केस कापून देई.परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी असा अवतार ठेवला नाही. क्लिनशेव्ह्ड असायचे ते. बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांनाउद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं असंआकलन करण्याला आपण वावच ऊरू दिला नाही. सेम केस तात्यासाहेब फुल्यांच्याबाबतीतही म्हणता येईल. त्यांचंही स्टाईल स्टेटमेंट असंच अफाट होतं.तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला म्हटलं की एवढं लॅविशका राहता? हे असं सोनं नाणं का घालता? हे असलं उंची का जेवता? तर एवढंचसांगा.. आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे घालतात. आपल्याशेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात. एक सितारा जन्माला आला अन्त्यानं सारं काही पालटून टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला.आपलं सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले तेनिर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या कमाईने आलेल्यावस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत. स्वाभिमान म्हणतात.

-धन्यवाद-वैभव छाया...✍️
-------------------------------------------------------


6】 बाबासाहेबांची महानता काय होती..?

ज्या ब्रिटन ने आपल्या भारत देशावर १५० वर्ष राज्य केले त्या ब्रिटनच्या पंतप्रधानाने म्हणजे विन्स्टन चर्चिल यांनी भारताची राज्यघटना वाचल्यावर उदगार काढले होते कि जर माझ्या देशात अराजकता माजली तर आम्हाला हि राज्यघटना आमच्या देशासाठी वापरायला अभिमान वाटेल , ज्या ब्रिटन ने ८०% जगावर राज्य केले त्या देशाच्या नेत्याचे हे वक्तव्य बाबासाहेबांची महानता काय होती हे सांगण्यास पुरे आहे , बाकी तर सारे जग गुण गातच आहे ...!!
** अमेरिकेमधे जोर्ज बुश आणि अल गोर यांच्यामधे झालेल्या २००० सालच्या अमेरिकेन अध्यक्ष निवङीच्या वेळी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता.. त्यावेली अमेरिकेतील सर्व घटना तज्ञ याना काहीही सुचत नवते.. त्यानी भारतीय राज्य घटनेतील तर्तुदीचा अभिप्राय मागवून बुश याना राष्ट्राध्यक्ष निवडले होते,
ही बाब किती भारतीयांना माहित आहे ??
आम नागरिकांना तर सोडाच पण आपल्या कीती राज्यकर्त्यानां माहीत आहे...????
 नरेंद्र भोसले...
वरील पोस्ट एकदम बरोबर आहे ....
अल गोर आणी बुश यांना समसमान मते पडली आणी राष्ट्रपती पद अडचणीत आले .
या वेळी काय करावे असा पेच प्रसंग निर्माण झाला जगातील कोणत्याही संविधानात या नंतर काय करावे ! याचे मार्गदर्शन नाही . तेंव्हा भारतीय संविधानात याची तरतूद मिळाली . संसदेच्या सभापतींनी आपले मत एकाच्या पारड्यात टाकून हा पेचप्रसंग सोडवला पाहीजे . तेव्हा अमेरिकन सभापतींनी बुशच्या पारड्यात मत टाकले . बुश हे डॉ . बाबासाहेबांचे आजही ऋण मान्य करतात !


-महेंद्र शेगावकर...✍️
-----------------------------------------------------------------
------------

7】 डॉ. बाबासाहेब जेव्हा लंडनमध्येडी .एस्सी .चा निबंध तयार करीत होते व बार-अॅट-लाॅचा अभ्यास करीत असता प्रथमएका कजाग व दरिद्री स्वभावाच्या लँडलेडीकडेविद्यार्थी म्हणून राहत होते.ती त्यांना कशी छळत होती व बाबासाहेबया छळांना तोंड देऊन कसा अभ्यास करीत होते,याबद्दलची माहिती श्री. प्रभाकर पाध्येयांनी दिलेली आहे . श्री .प्रभाकर पाध्येयांनी जानेवारी १९३९ मध्येबाबासाहेबांची राजगृहात मुलाखतघेतली ती मुलाखत त्यांनी एप्रिल १९४१ मध्येप्रसिद्ध झालेल्या आपल्या ' प्रकाशातीलव्यक्ती ' या पुस्तकात ग्रंथित केलेली आहे .लंडन येथील त्यांच्या आयुष्यक्रमाचे वर्णनमी त्यांच्याच तोंडून ऐकले तेव्हा माझ्या अंगावरशहारे आले. ते ज्या बाईकडे राहत होतेती अगदी नतद्रष्ट बाई होती .( " That Landlady was a horrible woman. I am alwayspraying for her soul, but I am sure she will go toperdition ! ")सकाळी ती न्याहारीला मला काय देत असेलअसे वाटते तुम्हांला? एक माशाचा तुकडा , एककप चहा , एक पावाचा स्लाईस आणि त्यावरअगदी थोडसा जॅम लावलेला ! ते कदान्न खाऊनमी म्युझियममध्ये वाचायला जाई. दुपारचे जेवणघ्यावयास मजपाशी पैसेच नव्हते . तसाचअर्धपोटी पाच वाजेपर्यंत वाचीत असे.घरी आल्यावर संध्याकाळचे जेवण ते जेवण म्हणजे एककप बॉव्हरीन आणि बटर बिस्किट्स ! नंतरपुन्हा वाचन ! रात्री दहाला कडकडून भूक लागे.मी काय खात असे माहित आहे ?माझ्या एका गुजराती मित्रानेमला पापडांची करंडी दिली होती. तेभाजण्याकरिता एक पत्र्याचा तुकडा कोठूनतरी मी तयार केला होता. तो माझा तवा !त्यावर भाजलेले चार पापड आणि कपभर दुध हेमाझे अन्न ! .अशा प्रकारे डॉ. बाबासाहेबांनी उपाशी -तापाशी राहून अनेक हालअपेष्ट सहन केल्या वआपले शिक्षण पूर्ण केले ,आणि कोटी कोटींचा उद्धार केला ......! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!



-राज जाधव...✍️

-----------------------------------------------------------------


8】 बाबासाहेब आंबेडकर यांची महान कामं☺️👌👌👌


१. भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले.
तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले.
याबरोबरच "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल" देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.
३. राज्यघटने मुळे सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले .
४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला.
५. प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला.
६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. "रिजर्व बँक ऑफ इंडिया" च्या स्थापनेचा पाया रचला.
७. संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही "चूल आणि मुल" सांभाळत बसल्या असत्या.
८. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.
हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली.
जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.)
१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून दिला.
११. पुरुषांना एकपत्नित्व अधिकार...
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.
१२. नियोजन आयोगाची स्थापना केली.
१३. पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.
१४. भारतात प्रथम जलनिती तयार केली व "नद्या जोडणी प्रकल्प" आखला पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.
१५. भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...
१६. ' कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.
१७. भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला.
१८. भारतात बालमजुरीवर रोख लावली.
१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
  ३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती...
२०. मजुरांना १२ तास काम करावे लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला.
२१.  ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, कामाचा मोबदला (ओवरटाईम) प्रावधान लागू केले.
२२. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.
२३. भारताला उच्च-नीच जातीवादातून मुक्त केले...
नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...
असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...
२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना समान अधिकार मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...
२५. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान.
२६. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान...
२७. “मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन” अशी घोषणा केली...
२८. "मजुरमंत्री" असतांना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली.
२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी ‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना केली.
३०. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली.
३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची स्थापना केली...
३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी RCC (रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)
३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी विभाजन करावे अशी सूचना मांडली.
आज भरपूर वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले...
३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..
३५. स्त्रीभ्रूण हत्त्या विरोध , व गर्भपात करू नये यासाठी जनजागृती...
३६. देशाला उपराजधानी ची गरज आहे हे सांगणारे प्रथम व्यक्ती...
३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे अजूनही झालेले नाही...
३८. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी कृषिमंत्री होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच.. ...
३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.
४०. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.
४१. एकमात्र भारतीय ज्यांना ब्रीटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे विशेष निमंत्रण दिले जायचे.
४२. एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...
४३. बाबासाहेब देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत.
४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते...
४५. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.
४६. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि *पाली व्याकरण व शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली...
४७. त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके:-
 माहार वतन बिल,
हिंदु कोड बिल,
,
खोत बिल,
मंत्र्यांचे वेतन बिल,
रोजगार विनिमय सेवा,
पेंशन बिल,
भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ.
४८. मराठी हि राजभाषा व्हावी यासाठी संसदेत मत मांडले...
४९. पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...
५०. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती. ...
५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस. सी. पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...
५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा भारतीय...
५३. देशात भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.
५४. देशातील जनतेला वैयक्तिक आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..
५५. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...
५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार म्हणून
मूकनायक
बहिष्कृत भारत,
प्रबुद्ध भारत
व जनता
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...
५७. ' बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु केली.
५८. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी* म्हणून उपस्थित राहिले...
५९. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध. ..
६०. बहुजनांसाठी मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार केला...
६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष केला...
६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य ...
६३. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘ मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली...
६४. हिंदूंसाठी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला...
६५.“UNTOUCHABILIT”  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून इंग्रजी भाषेत घेण्यात आला....
६६. भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान...
६७.त्यांनी स्थापन केलेल्या संघटना:
बहिस्कृत हितकारणी सभा,
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन इ.
६८.पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ...
६९.सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.
७०. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची स्थापना...
७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली....
७२. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना...
७३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता मिळवून दिली...
७४. भारताला राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह” मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र आहे....
७५. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....
७६. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...
७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...
७८. भारत देशाला तिरंगा व त्याच्या मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट दिली...
७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान):-
⚜भारतरत्न (भारत सरकार),
⚜द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया विद्यापीठ),
⚜द युनिवर्स मेकर(ऑक्सफर्ड विद्यापीठ),
⚜द ग्रेटेस्ट इंडियन(CNN IBN व History वृत्त   वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...
८०. एकमात्र भारतीय ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बनवले....
८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच आहेत...
८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...
८३. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे
बाबासाहेब  ....
८४. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री ,
समाजशास्त्री,
विधिज्ञ
राज्यघटनाकार
आधुनिक भारताचे जनक
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
मानववंशशास्त्र अभ्यासक,
पाली साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “ बोधिसत्व ”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व  प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक
होते..
वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.
वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
“आधुनिक भारत देशाचा निर्माता”(NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे
बोधिसत्व.प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...


-पोस्ट by - पंकज कांबळे..✍️

-------------------------------------------------------------------


9】 नामवंत ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि विचारवंत बट्राँड रसेल यांनी 'द प्रिन्सिपल्स आॕफ सोशल रिकन्स्ट्रक्शन' शिर्षक असलेले युध्दावर आधारित एक पुस्तक लिहीले होते. १९१७ मध्ये पहिले महायुद्ध चालू असताना हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. डाॕ बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाचे केलेले परिक्षन 'जर्नल आॕफ द इंडियन इकाॕनाॕमिक सोसायटी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. यावेळी बाबासाहेब फक्त २५-२६ वर्षाचे होते. त्यावेळी बट्राँड रसेल पूर्ण युरोपमध्ये अतिशय प्रसिद्ध तर्कशास्त्री होते. बाबासाहेबांनी रसेलच्या पुस्तकाचे केलेले परिक्षण पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले होते की, ज्या पुस्तकासंबंधी सारा युरोप बोलण्यासाठी घाबारतो, त्या पुस्तकावर आशिया खंडातील एक व्यक्ती लिहिण्याची हिंमत कशी करू शकते ? रसेल ताबडतोब बाबासाहेबांना भेटण्यासाठी ब्रिटिश म्युजियम लायब्रेरी लंडन येथे पोहचतो. ग्रंथपालाला बाबासाहेबांविषयी विचारल्यावर त्याच्या लक्षात येते की, बाबासाहेब भारतात परत आले तेव्हा बट्राँड रसेल नाराज होतो. तो ग्रंथपालाला सांगतो की, 'डाॕ बाबासाहेब आंबेडकर नावाचा व्यक्ती जेव्हाही येथे येईल त्यावेळी मला फोन करून बोलावून घेशील'. मला त्यांची भेट घ्यायची आहे. भारतातील जनता ओरडून सांगते की, म. गांधीजी मोठे महान होते की त्यांनी बट्राँड रसेलची भेट घेतली होती. तोच बट्राँड रसेल बाबासाहेबांच्या भेटीसाठी आतूर झाला होता. लाॕर्ड माऊंटब्याटन नी १९८४ ला लंडन येथे एक सुंदर गोष्ट सांगितली होती. माझ्या मनात एक इच्छा होती की, मी डाॕ आंबेडकर नावाच्या व्यक्तीला याच्या करीता भेटू इच्छित होतो की, ज्या विन्स्टन चर्चिल ने राष्ट्राला द्वितीय महायुद्धात विजय प्राप्त करून दिला होता तो विन्स्टन चर्चिल डाॕक्टर आंबेडकर या नावाने इतका प्रभावित का होता ? मला याचे आश्चर्य वाटते की, एक सत्ताधीश भारतासारख्या गुलाम देशांतील एका व्यक्तीने इतका प्रभावित होता. म्हणून ठरविले की, मी जेव्हा भारतात जाईन तेव्हा डाॕ आंबेडकरांची भेट अवश्य घेईन.   बट्राँड रसेलच्या 'द प्रिन्सिपल्स आॕफ सोशल रिकन्स्ट्रक्शन' वर लिहिताना बाबासाहेब 'Need to kill' आणि 'Will to kill' असे हिंसेसंदर्भाने विश्लेषण करतात.  अडीच हजार वर्षापूर्वी तथागत बुध्दाने हिंसेसंबंधाने सिंहसेनापतीला दिलेल्या उत्तरात केलेले विश्लेषण आणि तसेच हिंसेसंबधीचे विश्लेषण डाॕ बाबासाहेब आंबेडकर बट्राँड रसेलला उत्तर देताना करतात. हे अतिशय आश्चर्यकारक आहे की, १९५६ च्या धर्मांतराच्या ४० वर्षाअगोदर तथागत बुध्दाचेच उत्तर बाबासाहेबांच्या तोंडून येत आहे. ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आणि अलौकिक आहे.   पस्तीस वर्षे बुध्द धम्माचा मी अभ्यास केला असे बाबासाहेब सांगतात. याचा अर्थ बुध्द धम्माचा अभ्यास सुरू करण्याच्या पाच वर्षापूर्वीच हिंसेसंदर्भाने तथागताचेच विश्लेषण डाॕ बाबासाहेब आंबेडकर बट्राॅड रसेल ला देतात हे आपण समजून घ्यावे...  तरीही २८ आॅक्टोबर १९५४ ला 'बुध्द, कबीर आणि फुले हे माझे तीन गुरू आहेत' असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांचा हा greatness प्रतीकांचे उदात्तीकरण करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे. मुक्तीदाता परमप्रिय डाॕ बाबासाहेब आंबेडकरांची ही महानता त्यांच्या वेदनेशी एकरूप होऊनच समजता येते...फक्त बाबासाहेब !

-Kishor Chandane..✍️

---------------------------------------------------------------

-----------


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!