साधु संताविषयी बाबासाहेबांची ठोस मतं...!!!
1] साधुसंतांची शिकवण केवळ विद्वानांच्या शिकवणुकीपेक्षा कितीही भिन्न आणि उत्कर्षकारी असली तरी सुद्धा शोकजनक रीतीने ती अपयशी ठरली हे कोणालाही मान्य करावेच लागेल.दोन कारणांसाठी ही शिकवण निष्फळ ठरली.पहिली म्हणजे कोणत्याही संताने जातीपद्धतीवर हल्ला केलेला नाही.तर याविरुद्ध ते जातिभेदावर पूर्ण विश्वास ठेवणारे होते.त्यांच्यापैकी बहुतेक संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले व मेले.माझ्या माहितीनुसार संतांनी जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरुद्ध कधीही युद्ध पुकारले नाही. माणसा माणसात चाललेल्या भांडणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता तर माणूस आणि देव यांच्याशी असलेल्या नात्याशीच त्यांचे कार्य समबंधीत होते. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश अत्यंत भिन्न असून अत्यंत निरुपद्रवी आहे.कारण याचा उपदेश करणे कठिणही नाही व त्यावर विश्वास ठेवण्यात कसलाही धोका नाही.....
संतांचे कार्य निष्फल ठरले याचे दुसरे कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना अशी शिकवण देण्यात आली की संतांनी जरी जातनियमचे उल्लंघन केले तरी सामान्य लोकांनी तसे करू नये.म्हणूनच सामान्य लोकांना अनुसरण करण्यासाठी आदर्श म्हणून संतांचा कधीच उपयोग होऊ शकला नाही .हिंदू जनसमूह आजही जातींचा व अस्पृश्यतेचा अत्यंत कट्टर अनुयायी आहे.यावरून दिसून येते की साधुसंताने पुण्यमय जीवन व त्याचा उदात्त उपदेश यांचा त्यांच्या जीवनावर कसलाही प्रभाव पडला नाही...
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर...✍📚
【- Ref: Annihilation of Caste ]
------------------------------------------------------------------------------------------
2] संतांविषयी बाबासाहेबांचे मत...!
सोळाव्या शतकात साधुसंतानी 'सत्यशोधकी' कुऱ्हाडीचे घाव कितीतरी घातले...परंतु अश्पृश्यता रूपी फोफवलेला वृक्ष त्यांच्या हातून तोड़ला गेला नाहीच ; पण त्याचे पान सुद्धा त्यांच्याने हलले नाही...
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍📚
【Ref:बहिष्कृत भारत ३ जून,१९२७】
---------------------------------------------------------------------------------
3] ज्ञानेश्वराने तरी काय केले ? त्याने भगवतगीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला . त्या ग्रंथाचे सार काय ? तर जग हे ब्रह्ममय आहे. सर्व जगच जर ब्रह्ममय आहे तर मग महार मांगातही ब्रह्म असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही ? ब्राह्मणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला ? ब्राह्मणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही . मी महार - मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रह्ममय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही . सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात . तेव्हा तुम्ही पंढरी - आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही . आजचे युग हे विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागले पाहिजे...
-विश्वरत्न-डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍📚
【 - Ref: जुलै १९५३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ - भाग ३ पान क्र. ३६४ ; महाराष्ट्र शासन प्रकशित 】
-----------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment