डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३ भाषांचे ज्ञान होते…!!!



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३ भाषांचे ज्ञान होते…!

------------------------------------------------------------------------------

 ज्ञान मिळवण्यासाठी प्रचंड भूक असावी लागते, ज्या भाषेमध्ये ज्ञान उपलब्ध आहे ती भाषा अवगत केली. इंग्रजीमध्ये ज्ञान आहे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले, भारताचा प्राचीन इतिहास आणि धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी संस्कृत /पाली/ प्राकृत या भाषा अभ्यासल्या. संघटन वाढवण्यासाठी गुजराती /कन्नड/ बंगाली/ उर्दू /हिंदी या भाषा शिकल्या. जागतिक पातळीवरचे ज्ञान संपादन करण्यासाठी फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकल्या. विद्यार्थीदशेत पर्शियन भाषा शिकली. ज्ञानासाठी प्रचंड कष्ट उपसलेले व्यक्ती म्हणजे The Symbol of Knowledge डॉ बाबासाहेब आंबेडकर...

1) मराठी: मराठी ही बाबासाहेबांची मातृभाषा. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी सुरू केलेली सर्व वृत्तपत्रे ही मराठी भाषेतच होती. मूकनायक(1920), बहिष्कृत भारत(1927), जनता(1930), समता(1928) प्रबुद्ध भारत(1956) ही त्यांची वृत्तपत्रे मराठीतूनच प्रकाशित झाली, ज्यामध्ये त्यांनी अग्रलेख लिहिले. सार्वजनिक भाषणं, पत्रव्यवहार व लेखन यामध्ये मराठी भाषेचा उपयोग केला...


2) हिंदी: भारतातील व्यापक जनसमूहाशी संवाद साधण्यासाठी हिंदी आवश्यक आहे, असे बाबासाहेबांचे मत होते. मात्र, हिंदीची सक्ती नसावी हेही ते स्पष्टपणे सांगत. दिल्लीच्या राजकारणात सक्रीय असल्यामुळे त्यांचे हिंदीवर प्रभुत्व होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काही हिंदी लिखाणही केले आहे...

3) इंग्रजी: त्यांच्या शिक्षणाची व लेखनाची मुख्य भाषा इंग्रजी होती. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (इंग्लंड) व ग्रेज ईन येथे शिक्षण घेतले. बहुतेक सर्व महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी इंग्रजीमधून लिहिले. “इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हे त्यांनी मूकनायकमध्ये म्हटले होते. त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे इंग्रजी ग्रंथ..

1. History and Administration of the East India Company – 1915

2. Ancient Indian Commerce – 1916

3. Castes in India: Their Mechanism, Genesis and Development – 1916

4. The Evolution of Provincial Finance in British India – 1925

5. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution – 1923

6. Decentralisation of Imperial Finance in British India – 1925

7. Small Holdings in India and their Remedies – 1929

8. Annihilation of Caste – 1936

9. Federation Versus Freedom – 1939

10. The Rise and Fall of Hindu Women – 1942

11. Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables – 1943

12. What Congress and Gandhi Have Done to the Untouchables – 1945

13. Pakistan or The Partition of India – 1945

14. Who Were the Shudras? – 1946

15. The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables – 1948

16. States and Minorities – 1947

17. The Grammar of Anarchy (Constituent Assembly speeches on Constitution) – 1949

18. The Hindu Code Bill – 1951

19. Buddha and Karl Marx – 1956

20. Thoughts on Linguistic States – 1955

21. Revolution and Counter-Revolution in Ancient India – 1955 (मरणोत्तर)

22. The Buddha and His Dhamma – 1957 (मरणोत्तर)

23. Riddles in Hinduism – 1987 (मरणोत्तर)

24. Philosophy of Hinduism – 1987 (मरणोत्तर)

25. Essays on Untouchables and Untouchability – 1948–50 दरम्यान लेखन (मरणोत्तर संकलन)

26. Ranade, Gandhi and Jinnah – 1943

27. The Problem of Political Suppression – (वर्ष अज्ञात, भाषणात्मक स्वरूप)

28. Waiting for a Visa is an autobiographical document written by B. R. Ambedkar during the period of 1935–36... Published- 1990

... इत्यादी संशोधन करून त्यांनी इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिले...


4) फारसी (Persian): शालेय शिक्षणात त्यांनी फारसी विषय घेतला होता. संस्कृत घेण्याची इच्छा असूनही अस्पृश्यतेमुळे ते शक्य झाले नाही. त्यांचे बी.ए. ला इंग्रजी व फारसी विषय होते. त्यामुळे या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते...

5) गुजराती: बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. त्या बॉण्ड मधील अटीनुसार त्यांना बडोद्यात प्रशासकीय सेवेत काम करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे त्यांनी गुजराती भाषेचे ज्ञान मिळवले. त्यांनी गुजराती भाषेत भाषणेही दिली होती. उदाहरणार्थ, 30 नोव्हेंबर 1945 रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथे बाबासाहेबांनी भाषण केले, त्यांनी सुरुवातच करताना म्हटले की, " अध्यक्षांनी मला गुजरातीत बोलण्याची विनंती केली आहे, गुजरातीत मी बोलू शकतो पण हल्ली तिचा थोडासा विसर पडला आहे. तरीपण मी गुजरातीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे..." त्यांनी संपूर्ण भाषण गुजराती भाषेत केले... 

6) फ्रेंच: कोलंबिया विद्यापीठात त्यांनी फ्रेंच भाषा शिकली. फ्रेंच तत्त्वज्ञान आणि विचारवंतांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी फ्रेंचचा सखोल अभ्यास केला. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन याचे चरित्र त्यांच्यावर प्रभाव टाकणारे होते...

7) जर्मन: कोलंबियात त्यांनी जर्मन भाषेचेही शिक्षण घेतले. त्यांना वाचता, लिहिता आणि बोलता येत होते. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला होता, तो जर्मन भाषेतच होता. युरोपियन तत्त्वज्ञान, विशेषतः मार्क्सवादी विचार समजून घेण्यासाठी त्यांनी जर्मनचा अभ्यास केला होता. “मी कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान कोळून पिलोय” असा आत्मविश्वास त्यांना जर्मन ज्ञानामुळेच आला असावा...

8) पाली: मॅट्रिक नंतर केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र भेट दिले, तेव्हापासून बौद्ध विचार त्यांच्या जीवनाचा भाग बनले. 'बुद्धा अँड हिज धम्मा' लिहिण्यासाठी त्यांनी त्रिपिटक व बौद्ध साहित्य वाचले. त्यांनी पाली भाषेचा शब्दकोश तयार केला होता. पाली भाषेचे व्याकरण लिहिले...

9) संस्कृत: शाळेत संस्कृत शिकण्याची त्यांची इच्छा असूनही त्यांच्या कनिष्ठ जातीमुळे त्यांना संस्कृत नाकारली गेली. पुढे त्यांनी वैदिक ग्रंथ, मनुस्मृती आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत शिकली. RSS चे दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’ या ग्रंथात डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत ज्ञानाचे संदर्भ आहेत. डॉ.आंबेडकरांनी मुंबई व दिल्लीत वास्तव्यास असताना पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री आणि पंडित सोहनलाल शास्त्री यांच्याकडून संस्कृतचे धडे घेतले. सोहनलाल शास्त्री यांच्याशी त्यांचे संस्कृतमधून संवाद होत असत. डॉ. आंबेडकरांनी 1930 ते 1942 या काळात संस्कृतचे शिक्षण घेतले. पंडित नागप्पा शास्त्री 1937 मध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नातून स्थापन केलेल्या गुरु नानक खालसा कॉलेज, मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक होते. पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी संविधान सभेत डॉ. आंबेडकरांना संस्कृत मध्ये प्रश्न विचारले असता, त्यांनी सर्व उत्तरे संस्कृतमध्येच दिली, आणि ही घटना वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली होती...

10) प्राकृत: पालीसह प्राकृत भाषेचाही त्यांनी अभ्यास केला होता. प्राकृतमध्ये जैन आणि बौद्ध साहित्य सापडते. प्राकृतचे व्याकरण लवचिक असल्यामुळे अनेक लोकभाषा यामध्ये सामावल्या जातात...

11) उर्दू: बौद्ध विचारवंत शांतिस्वरूप बौद्ध यांनी सांगितले की बाबासाहेबांना उर्दूचे ज्ञान होते. लाहोरमध्ये त्यांच्या वास्तव्यामुळे आणि मुस्लिम समाजातील संवादामुळे ही भाषा त्यांनी आत्मसात केली होती. उर्दू ही भारत व पाकिस्तानातील महत्त्वाची भाषा आहे...

12) कन्नड: बेळगाव, निपाणी हे भाग बॉम्बे प्रांतात येत असत. बाबासाहेबांचे तिथे संघटन कार्य होते. त्यामुळे त्यांना मोडकं-तोडकं कन्नड येत होतं. कन्नड भाषा त्यांना संपूर्ण समजत होती...

13) बंगाली: 1946 मध्ये संविधान सभेसाठी बाबासाहेबांना बंगालमधून निवडणूक लढवावी लागली होती, ते खुलना फरिदपूर, बोरीसाल इत्यादी जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी स्वतः फिरले होते. त्यामुळे त्यांनी बंगाली भाषा अवगत केली. बाबासाहेब स्वतः म्हणाले आहेत की " मला बंगाली चांगली समजते ". बंगाली ही जगातील एक मोठी भाषिक लोकसंख्या असलेली भाषा आहे, सध्या बांगलादेशाची ती राष्ट्रभाषा आहे.
या व्यतिरिक्त ग्रीक, लॅटिन आणि अरबी या भाषेचा सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यास होता
 जो व्यक्ती बहुभाषिक असतो, त्या व्यक्तीमध्ये तीव्र जिज्ञासा, उच्च बौद्धिक क्षमता, स्मरणशक्ती, तुलनात्मक अभ्यास, समृद्ध ग्रंथालय, सातत्य, स्वयंशिस्त, सांस्कृतिक संवेदनशीलता इत्यादी गुण परिपूर्ण असतात. 
चला नवीन भाषा शिकूया... ज्ञानाची भाषा शिकूयात...!

जय भीम...
Article by- सिद्धार्थ शिनगारे सर...✍️💗
संस्थापक अध्यक्ष: भारतीय हितकारिणी संघ
(संपर्क क्रमांक : 7798757923)

Reference List (संदर्भ सूची):

1. Ambedkar, B. R. (1920). Mooknayak.

2. Ambedkar, B. R. (1957). Buddha and His Dhamma.
3. Ambedkar, B. R. (1998). Writings and Speeches: Vol. 16 (Pali-English Dictionary). Government of Maharashtra.
4. Ambedkar, B. R. (2002) Writings and Speeches: vol. 18, part 2. Government of Maharashtra
5. Ambedkar, B. R. (2005). Writings and Speeches: Vol. 19. Government of Maharashtra.
6. Ambedkar, B. R. (2005). Writings and Speeches: Vol. 20. Government of Maharashtra.
7. Jaffrelot, C. (2005). Dr. Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste. Permanent Black.
8. Keer, D. (1990). Dr. Babasaheb Ambedkar: Life and Mission. Popular Prakashan.
9. Khairmode, B. C. (2022). Dr. Babasaheb Ambedkar: Jeevan Charitra (12 Vols.). BARTI
10. Kamble, B. C. (1991). Dr. Babasaheb Ambedkar: Jeevan Charitra (24 Vols.). सुगवा प्रकाशन
11. Omvedt, G. (2004). Ambedkar: Towards an Enlightened India. Penguin.
12. Scott, S. R. (2023). The Evolution of Pragmatism in India: Ambedkar, Dewey, and the Rhetoric of Reconstruction. University of Chicago Press.
13. Teltumbde, A. (2024). Iconoclast: A Reflective Biography of Dr. Babasaheb Ambedkar. Penguin
14. Zelliot, E. (2001). From Untouchable to Dalit: Essays on the Ambedkar Movement. Manohar.
15. Rege, J., Gould, W., et al. (2023). Ambedkar in London. Hurst Publishers.
16. Shantiswaroop Bauddha. Speeches and personal writings.
17. Hiwale, S. (2024). या 12 भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत होत्या! धम्म भारत.
18. ठेंगडी, दत्तोपंत. सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब. सावरकर दर्शन प्रकाशन.
19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आत्मकथा, संपादक: शंकरराव खरात. नवयुग, खास अंक, ता. १३.०४.१९४७.

--------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!