रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यामधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान...!!


1】 रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान...!! 


डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान
आहे हे एव्हाना फेसबुक वरील काही पोस्टींग वरून सर्वाना माहित झाले आहेच,
परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे.
रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते.
रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली स्थापन ब्रिटीश ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५
साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावरआधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे.
आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ
सन १९१५ साली "प्राचीन भारतीय अर्थनीती" (Ancient Indian Commerce)
या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६
साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा
प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स
या कंपनी ने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (the evolution of
provincial finance in british india ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी
या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या.
विद्यापीठाने अधिकृत पणे doctor of philosophy हा किताब बहाल केला.
सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक
प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " ( the problem the rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) हि पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे सखोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर कटाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या
वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास, विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली.
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४ - २५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रोयल समिती" नेमली होती,त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात;या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले,या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला
बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे,चलनाचा मानदंड काय असावा. संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण,
जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे,महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक,अर्थ
शास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. Read "Statement of
Evidence to the royal Commission On Indian Currency"
१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रोयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९
साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली
१९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती ;
याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले
याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली; याच वर्षी बाबासाहेबांनी
येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते.
इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने डौलाने उभी आहे.
भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा
बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट ने दिले आहे परंतु बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.....

- Amol Gaikwad...✍
【Ref-Thoughts and philosophy of Dr Ambedkar-  C.D.NAik Dr Ambedkar-  economic and political ideology - S.R.Bakshi】
-------------------------------------------------------------------------


2】आज आपण भारतीय चलनात "रिजर्व बँक ऑफ इंडिया" हे जे नाव वाचतो,त्याची मूळ संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आहे, त्यांनी हिल्टन कमिशनला सादर केलेल्या रिपोर्टचा आधार रिजर्व बँक स्थापन करताना घेण्यात आला आहे, देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या शोधनिबंधात रिजर्व बँकेची कल्पना केली होती, आज आपण वित्त आयोग,केंद्रातील संपत्तीची वाटणी राज्यांमध्ये कशी असावी,केंद्रीय क्षेत्राबद्दल बोलतो याचा सखोल अभ्यास व विश्लेषण बाबासाहेबानी केले आहे.

तत्पूर्वी बाबासाहेबांचा अर्थशास्त्र म्हणून झालेला प्रवास फार खडतर असला तरी रोमांचक आहे, कोलंबिया विद्यापीठात दिवसातील सोळा ते अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांनी प्रोफेसर सेलिंग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली "The national dividend of india-a Historical and analytical study" या विषयावर phd साठी आपला प्रबंध सादर केला,त्यांना पदवी दिली परंतु ती जाहीर करण्यात आली नाही कारण,त्यावेळी मान्यताप्राप्त प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्यावर त्याच्या प्रति विद्यापीठाला सादर केल्यानंतरच पदवी जाहीर केली जात असे, त्यामुळे "The evolution province finance in British India" ( ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती" या नावाने हा ग्रंथ "पि.एस. किंग अँड कंपनी" यांनी प्रकाशित केला,आणि त्याच्या प्रति विद्यापीठाला सादर केल्यानंतर ८ जून १९२७ रोजी बाबासाहेबांना पदवी जाहिर झाली. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर अर्थशास्त्र जगात त्याची जोरदार चर्चा सुरू होती, "Modern review" ह्या कलकात्याहून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात डॉ.प्रफुलचंद्र बसू यांचे परीक्षण प्रसिद्ध झाले होते, बसू लिहितात," हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आतापर्यंत एकाही अर्थशास्त्रज्ञाने संशोधनपूर्वक अभ्यास करून एकही ग्रंथ लिहिला नाही,ही उणीव डॉ.आंबेडकरांनी भरून काढली आणी ते या विषयावर आणखीन दोन ग्रंथ लिहून आपले मौल्यवान विचार मांडणार आहेत" (ही नोंद खैरमोडे यांनी खंड २ मध्ये केली आहे) हा ग्रंथ म्हणजे "सार्वजनिक वित्त" ह्या विषयावर भाष्य करणारा पहिलाच ग्रंथ म्हणावा लागेल. हल्ली वित्त आयोगाकडून होणाऱ्या महत्वाच्या भूमिका बऱ्याच जणांना माहीत असल्यातरी वित्त आयोगाच्या अहवालाचा पाया हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिकित्सामय लिखाणातून घातला गेला आहे  याची जाणीव बऱ्याच जणांना नाही.  

कोलंबिया विद्यापीठाचा अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब इंग्लंडला "london school of economics and political science" या संस्थेत प्रवेशासाठी आले, त्यांची बुद्धिमत्ता पाहुन संस्थेने त्यांना MSC साठी थेट प्रवेश दिला,त्यावेळी त्यांनी "Provincial Decentralisation of Indian Finance" या नावाचा प्रबंध लिहिण्याचे निश्चित केले,परंतु दरम्यान बडोदे संस्थानाने दिलेली मुदत संपत आली त्यामुळे बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. परंतु काही काळाने शिक्षणाच्या रकमेची तरतूद करून बाबासाहेब पुन्हा लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये परतले आणि "रुपयाचा प्रश्न: त्याचा उगम व उपाय" हा प्रबंध त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या उच्चपदवीसाठी निवडुन तो पूर्ण करून सादर केला. या संस्थेतून पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते, हा प्रबंध १९२३ साली पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला, त्याची प्रस्तावना तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ एडविन कॅनन यांनी लिहिली. त्यावेळचा प्रसिद्ध अर्थतज्ञ "जॉन मेनार्ड केन्स" यांचा चलनाविषयी सिद्धांत प्रमाण मानला जायचा, तो सिद्धांत बाबासाहेबानी सप्रमाण खोडून रुपया स्थित कसा राहील याचे विवेचन आपल्या ग्रंथात केले होते.

खरंतर बाबासाहेब फक्त अर्थशास्त्रज्ञ नसून ते खरे अर्थप्रशासक होते. त्याकाळी ही बाबासाहेबांवर टीका झाली आणि आजही होत आहे, " डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आणि चळवळीची दिशा " नावाचे एक पुस्तक आहे,संपादक देवेंद्र उबाळे आहेत आणि आनंद तेलतुंबडे यांनी प्रस्तावना लिहिली असून त्यांचा त्यात एक लेख सुद्धा आहे, तेलतुंबडे प्रस्तावनेत म्हणतात की, बाबासाहेबांचे पीएचडी आणि डीएससी साठी लिहिलेले प्रबंध हे आर्थिक प्रश्नांची मीमांसा करणारे होते, पण त्यात दलितांसाठी काय होते? असा प्रश्न तेलतुंबडे करतात,वरवर वाचताना त्यांचा प्रश्न बऱ्याच जणांना बरोबर वाटेल ही, परंतु मला तो प्रश्न कमी पण आरोपच जास्त वाटतो. त्यामुळे यावर बोलणे गरजेचे आहे. मुळात अगोदर शिक्षण आणि मग चळवळ हे बाबासाहेबानी ठरवून ठेवले होते,यासाठी खैरमोडे यांच्या पहिल्या खंडातील सयाजीराव गायकवाड आणि बाबासाहेब यांच्यातील संवाद महत्वपूर्ण ठरतो, सयाजीराव गायकवाड बाबासाहेबाना विचारतात,तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा असे वाटते? बाबासाहेब म्हणतात, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स.सयाजीराव पुढे विचारतात, या विषयावर अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस? बाबासाहेब उत्तरतात, या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गांनी मी समाजसुधारणेचे कार्य करीन" त्यामुळे तेलतुंबडे यांनी दलितांसाठी काय? हा आरोप फोल ठरतो. बाबासाहेब आपल्या प्रबंधातून देशाचे हित सांभाळतात, सर्वसामान्यांच्या हीताला प्राधान्य देतात,सर्वसामान्य माणसात दलित ही आलाच.त्यांना दलितांचा उद्धार करायचाच होता पण त्यासोबत देशाच्या उद्धाराला ही हातभात लावायचा होता. बाबासाहेबांचे मार्गदर्शक एडविन कॅनिन यांनी प्रस्तावनेत लिहिलेले वाक्य फार महत्वाचे आहे,ते लिहितात, हे म्हणणे काही लोकांना अडणार नाही की,ज्यांना किमती वाढल्यावर अधिक नफा कमवायचा आहे,परंतु ज्या लोकांना या अधिकच्या महागाईमुळे बाधित होणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती आहे,त्यांना कदाचित हे लिखाण योग्य वाटेल.समाजासाठी स्थिरता ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे," ह्यातून एक गोष्ट सिद्ध होते की बाबासाहेब महागाईने पोळणाऱ्या लोकांच्या बाजूने आहेत, मग महागाईने पोळणारे कोण आहेत? प्राध्यापक. केन्स ज्यांच्या बाजुने उभे राहतात ते श्रीमंत की भांडवलदार? याचे उत्तर तेलतुंबडे यांनी शोधायला हवे होते.

बाबासाहेबाना विद्यार्थी दशेतच अर्थतज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती,जॉन मेनार्ड केन्सचा सिद्धांत सप्रमाणात खोडल्यावर बाबासाहेबांची पदवि धोक्यात आली होती.युरोपियन जगात बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय विचारांची,प्रबंधाची चर्चा सुरू झाली होती,म्हणूनच भारताच्या चलन पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी बादशहा पंचम जॉर्जने १९२८ मध्ये "रॉयल कमिशन व इंडियन करन्सी अँड फायनान्स" नावाचे कमिशन नेमले.या कमिशचे अध्यक्ष एडवर्ड हिल्टन यंग होते.ह्या कमिशनने ४६ अर्थतज्ञांच्या साक्षी घेतल्या त्यात बाबासाहेब ही सामील होते.१५ डिसेंम्बर १९२५ ला बाबासाहेबाना साक्षी देण्यासाठी बोलावले तेव्हा सभासदांच्या हातात आपल्या ग्रंथाची प्रत असल्याचे बाबासाहेबानी दिसून आले, सदस्यांनी बाबासाहेबांची तोंडी चर्चेत खूप झडती घेतली,बरेच प्रश्न केले,बाबासाहेबानी प्रश्नांचे निरासन केले, या कमिशमचा अहवाल चार खंडात बाबासाहेबांच्या लेखी साक्षीसह प्रसिद्ध झाला,आणि ह्याच कमिशनच्या अहवालातून पुढे रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. रिझर्व्ह बँकेला अमुक वर्षे झाली म्हणून कार्यक्रमात नेते मंडळी भाषणे झोडतात परंतु बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण कोणाला होत नाही,हे खेदाने म्हणावे लागते.

रिजर्व बँक ही १ एप्रिल १९३५ रोजी, ब्रिटिशकाळात स्थापन झाली, बाबासाहेबानी प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये केलेले विश्लेषण इतकं जबरदस्त होतं की,ब्रिटिश सरकारने भारतातील परंपरागत व्यवसायांचे केलेले शोषण संपूर्ण जगासमोर आले, आणि त्याचवेळी तत्कालीन काँग्रेसने बाबासाहेबांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या मांडणीला उचलून,ब्रिटिशांना कैचीत पकडलं,याचाच परिणाम असा झाला की,हे एकूण प्रकरण तपासण्यासाठी लंडनहून रॉयल कमिशनची स्थापना झाली.

भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या महायुद्धाची जास्त झळ न पोहचता अर्थव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून,रिजर्व बँकेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले, जी भारतातील इतर बँका व वित्तीय संस्था यांवर अंकुश ठेवून अर्थव्यवस्था सुरळीत ठेवेल,यासाठी बाबासाहेबानी लिहिलेल्या तीन आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून रिजर्व बँकेची सुरुवात करण्यात आली, आज रिजर्व बँक ही केंद्रीय बँकिंग संस्था आहे,जी भारतातील चलन नियमावली व आर्थिक बाबींवर,भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते, 
रिजर्व बँकेची स्थापना जरी १९३५ रोजी झाली असली तरी,१९४९ रोजी रिजर्व बँक ही अधिकृत आणि भारत सरकारच्या अमलात आणण्यात आली. 

इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, १९३५ साल फार महत्वाचे आणि कायम स्मृतीत राहील असे आहे, कारण बाबासाहेबांसमोरील आव्हान दुहेरी होते, एकीकडे ब्रिटिशांशी सनदशीर आपल्या हक्कांची मागणी करणे व दुसरीकडे आपल्या समाजाच्या लोकांचा उद्धार करणे, १९३५ साली जेव्हा रिजर्व बँक स्थापन झाली तेव्हाही बाबासाहेबांचे मोर्चे,आंदोलने,पक्ष बांधणी,न्याय हक्क,लिखाण हे सर्व सुरूच होते तसेच याच वर्षी त्यांची विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली,याच वर्षी बाबासाहेबानी नाशिक मध्ये येवला ठिकाणी सभा घेऊन मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली,आणि याच वर्षी बाबासाहेबांची लाडकी रामू आणि सकळ बहुजनांची माय, रमामाई यांनी जगाचा निरोप घेतला.

बाबासाहेबानी रिजर्व बँकेसाठी आणि आर्थिक व्यवस्थेसाठी सुचविलेले मार्गदर्शक तत्वे,नियम आणि कार्यप्रणाली आज ही ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम करतात, पण त्याचा वापर योग्य हाताने व्हायला हवे....

- अरविंद वाघमारे...✍️💞
------------------------------------------------------------------------------

3】 01 April Reserve Bank Of India स्थापना दिन आणि बाबासाहेब...!!


राजकारण हे बघायला गेले तर सामाजिक विकासासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि पद्धत आहे. आणि अर्थशास्र हे त्या समाजविकासाचा गाभा असतो. म्हणून राजकरण, समाजकारण आणि अर्थकारण हा गुंतागुंतीचा विषय आहे.  
समाजकारणाच्या गाभाऱ्यात म्हणजेच अर्थव्यवस्थेत जो पर्यंत उत्क्रांती घडून येत नाही तोपर्यंत सामाजाच्या एकंदरीत सर्व स्तरात उत्क्रांती घडून येत नाही, येऊ शकत नाही.   
म्हणून बाबासाहेब म्हणतात "we have attained political freedom and equality but without 'economic' and social equality this is quite insufficient."
यावरून लक्षात येईल कि अर्थशास्र हा विषय किती गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. आणि ह्याच दृष्टीकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा  M.A. चा thesis Äncient Indian Commerce, M.sc. चा thesis "The Evolution of Provincial finance In British India" आणि D.sc. चा thesis " The Problem of the Rupee." लिहिला. त्यांच्या ह्या विविध अर्थशास्त्रीय संशोधन ग्रंथातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या समस्याला उजेडात आणले आहे, त्यावरचे उपाय दिले आहे. यातून त्यांनी भारतीय शेतकरी,शेत मजूर, कारखानदार मजूर, छोटे व्यापारी, उत्पादन वाढीच्या समस्या आणि त्यावरचे उपाय, जातीच्या उतरंडीत अर्थव्यवस्थेचे झालेले महाकाय नुकसान... सारख्या प्रश्नांना मांडले आहे. त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात समग्र समाजाचे उत्थान दिले गेले आहे. तिथे त्यांनी फक्त अस्पृश्य वर्गालाच गृहीत धरले नाही. हे सर्व ग्रंथ बाबासाहेबानी भारत स्वातंत्र होण्याच्या आधीच नाही तर त्या स्वातंत्राची मागणी सुरु होण्या आधी किती तरी वर्षे लिहिले. यातून त्यांच्या India as a nation ची कल्पना किती मूळ धरलेली होती हे स्पष्ट होते. इंग्रजांच्या शासन व्यवस्थेत स्वराज्याच्या नावाखाली राजकीय हिस्सा साठी राजकारण न करता एक सार्वभौम राष्ठ्र म्हणून ते भारताच्या उभारणीचा विचार करत होते.    
बाळ टिळक "गीता रहस्य", गांधी "हिंद स्वराज्य" आणि सावरकर "हिंदुपद पादशाही"लिहीत असताना बाबासाहेबानी  "  १) Äncient Indian Commerce, २)The Evolution of Provincial finance In British India ३)The Problem of the Rupee." सारखे ग्रंथ लिहून आपली कल्याणकारी योजना जात आणि धर्माच्या पलीकडे नेऊन मांडली. बाबासाहेबानी जो " The Problem of the Rupee" लिहिला त्याच्या  पायावरच "Reserve Bank Of India" ची ०१ एप्रिल १९३५ ला स्थापना झाली. ही सर्वोच्च बँक, बँकांची बँक म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची monitoring करत असते एक नियंत्रक म्हणून.     

"The Problem of the Rupee" ह्या ग्रंथाबद्दल जागतिक वर्तमानपत्रांनी तेंव्हा  काय म्हटलं होतं?

The Times : ëxcellellent piece of work. English style is easy;and his knowledge of his subject obviously very full..."

The Economist : "it is a clear and ably written book. Certainly, none of the other numerous works on one or other aspect of the monetary problem have anything like the readability of this tract."

The Financer : " Ambedkar deals with the problem in a very lucid and praiseworthy manner and puts forward not merely its origin, but also valuable proposals for a solution,which should be studied by bankers and those merchants whose business depends upon the exchange." 

#thanks_Ambedkar
- Rahul Pagare...✍️
-------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!