भारतीय स्वातंत्र्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान,व त्यांचे महत्वपूर्ण विचार... !!



1】नवीन आलेले व्हाईसराय लॉर्ड माउंटबेटन यांनी ३ जून १९४७ ला एक योजना जाहीर केली. तीमध्ये फाळणीची बीजें स्पष्टपणे रुजलेली होती. या संधीचा फायदा घेऊन काही संस्थानिकांनी आपण स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ ब्रिटीश पार्लमेंट ने १५ जुलै १९४७ ला भारताचा स्वतंत्र कायदा पास केला आणि बरोबर एका महिन्याने १४ ओगस्ट १९४७ ला  रात्रौ बारा नंतर भारताला स्वराज्याचे दान करण्यात आले,त्याच बरोबर पाकिस्थानचाही जन्म झाला. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीनंतर भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी सत्ताग्रहण करून आपले सरकार बनविले. कॉंग्रेस व्यतिरिक्त  बाहेरच्या प्रमुख व्यक्तींचाही त्यांनी मंत्रिमंडळात समावेश केला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदामंत्री झाले. नेहरूंनी मंत्रिमंडळाची निवड योग्य केली. सरकारशी आणि कॉंग्रेसशी दोन हात करणारे बाबासाहेब त्यांचे सहकारी बनले.
समाजात नेहमी दोन प्रवृत्तीचे लोक असतात,दुसऱ्याचे काहीही होवो माझे कल्याण झाले पुरे; हा पहिला प्रकार. आपल्याबरोबर दुसऱ्याचेही हित साधले गेले पाहिजे;त्याचा आनंद तो काही प्रमाणात आपलाही आनंद आहे,असे मानणारा दुसरा प्रकार.  वेळप्रसंगी स्वत:च्या मतास मुरड घालून सार्वजनिक जीवन सुरक्षित होत असले तर त्याग करण्याची व पडेल ते कष्ट उचलण्याची अशा लोकांची तयारी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वर्गात मोडतात. त्यांनी आपला विरोध बाजूला सारून मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून काम करायचे मान्य केले. आपल्या हट्टी धोरणाने ब्यारीस्टर जीनांनी आपले इच्छित साध्य केले. ब्रिटीश पार्लमेंट व मोठ मोठे मुत्सद्धि, बाबासाहेबांची योग्यता ओळखून होते. बाबासाहेबांनी आपला हेका तसाच चालू ठेवला असता तर त्यांचीही मागणी ब्रिटीश पार्लमेंटला डावलता आली नसती. हिंदू समाज आणि कॉंग्रेसवर सुडच घ्यायचा असता, तर त्यांनी तेही केले असते. पण बाबासाहेब हाडाचेच दयाळू असल्यामुळे त्यांनी पुणे-कराराच्या वेळी असामन्य त्याग करून गांधींचे प्राण वाचविले आणि आपल्या मतास मुरड घालून स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदेमंत्री बनले.
मंत्री बनून मानाच्या खुर्च्या पटकावणे हे फारसे कठीण नाही. दुसऱ्याचा ओंजळीने पाणी पिउन व आपल्या जमातीच्या हितावर विस्तव ठेऊन मंत्रिपदे भूषविणारे हरीचे लाल शेकड्यांनी मिळतील, पण बाबासाहेबांचा पिंड परप्रत्ययनेय बुद्धीचा मुळचा नव्हता, म्हणून त्यांनी आपल्या जमातीचे हित साधूनही भारताची सेवा स्वाभिमानाने करता येते,हे प्रत्यक्ष उदाहरणाने दाखवून दिले.

सं/ले. - विवेक घाटविलकर...✍️

----------------------------------------------------------



2】 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पहील्यांदा स्वातंत्र्याची मागणी केली...

22 नोव्हेंबर हा दिवस आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात अत्त्यंत महत्वाचा आहे, कारण याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती......

22 नोव्हेंबर 1930 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडला ,पहिल्या गोलमेज परिषेदेत भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली,बाबासाहेब इंग्रजानां बोलतात, 'तुम्ही आमचे मालक बनण्यासाठी उत्सुकत असालही, पण आम्ही तुमचे गुलाम बनण्यास मुळीच तय्यार नाही'. तुम्ही भारतावर राज्या करावे ही बाब लांच्छनास्पद आहे, "माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्येंत मी स्वातंत्र्यासाठी लढेल"
बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले, आणि दुसऱ्या दिवशी "लंडन टाइम्स" या वृत्तपत्रात ही बातमी छापून आली,
जेव्हा ही बाब भारतात गांधीला कळली, गांधी ने बाबासाहेबांशी भेटीची इचछा व्यक्त केली, या भेटीत गांधी बाबासाहेबांना म्हणतात की "आंबेडकर तुम्ही खरंच सच्चे देश प्रेमी आहेत"..या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 ला गांधीने इंग्रजांन विरुद्ध "भारत छोडो "आंदोलन सुरू केले.
'इंग्रजांपुढे ठामपणे स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले भारतीय म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय'...

-राज कांबळे...✍

------------------------------------------------------

3】 ☆... लोकशाही स्वातंञ्याबद्दल बोलताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...☆" एक स्वतंञ माणूस म्हणजे असा एक माणूस की जो कितीही लहान किंवा महान असेल. जो असल्या तसल्या विभूतीच्या पायावर आपले स्वातंञ्य अर्पण करित नाही. स्वतंञ बुध्दीने विचार करतो आणि स्वतंञ बुध्दीने जगत असतो तोच खरा स्वातंञ्यात आहे असे मी म्हणेन...💖💖 

★स्वतंत्रदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप सदिच्छा...💐💐★

----------------------------------------------------------------------


4】 "मी देशाशी केव्हाही विद्रोह केला नाही, देशाचे हितच ह्रदयात सतत बाळगले. गोलमेज परिषदेच्या वेळी देशाच्या हिताच्या दृष्टिने मी गाँधीजीच्यांही पुढे 200 मैल होतो."...!

-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍️📚

【Ref:31 मे 1952, मुंबई...!】
----------------------------------------------------------------


5】 स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा,नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर,आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत की, जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही....--

-विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍️📚 

 【Ref-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६】
 ---------------------------------------------------------------------------------------



6】 What Dr. Ambedkar said on Independence Day (15th August)....
“It is not enough to have just a politically independent India. What is also needed is to have an Indian nation where every citizen will have religious and political rights, so that every person will have equal opportunity to develop.”
“Independence is no doubt a matter of joy. But let us not forget that this independence has thrown on us greater responsibilities. By independence, we have lost the excuse of blaming the British for anything going wrong. If hereafter things go wrong, we will have nobody to blame except ourselves. There is a greater danger of things going wrong. Times are fast changing.”
“There is no nation of Indians in the real sense of the world, it is yet to be created. In believing we are a nation, we are cherishing a great delusion. How can people divided into thousand of castes be a nation? The sooner we realise that we are not yet a nation, in a social and psychological sense of the world, the better for us.”
---------------------------------------------------------



7 】 I am no opponent of Nationalism, Swaraj or Independence, if it could be assured of that independence, education and welfare is promised to the Nation.
I will certainly fight for the Nationalism and Independence, but if all those long talk, tall philosophy is followed by nothing else than what we call " One step-Dance" and if it is confined the governing class and political power is used to strengthen that community the rights of others, Then It is just transfer of power no full independent for us.Well the government of India may not be established as it being done now?"
-Dr.Babasaheb Ambedkar...✍️📚
---------------------------------------------------------------------

8】Independence means nothing more than that a nation has liberty to determine its form of government and its social order without dictation from outside. The worth of independence depends upon the kind of government and the kind of society that is built up. There is not much value in independence if the form of government and the order of society are to be those against which the world is fighting today...

-Vishwratna.Dr.Babasaheb Ambedkar...✍️📚
【Ref:Babasaheb Ambedkar Writings and Speeches. Volume 10. pg. 41】
----------------------------------------------------------------------

9] ‘The governing class in India has no such intention of making any sacrifice on the altar of Indian Freedom. Instead of surrendering its privileges in the name of nationalism, the governing class in India is using or misusing the slogan of nationalism to maintain its privileges. 

Whenever the servile classes ask for reservations in the Legislatures, in the Executive and in public
services, the governing class raises the cry of ‘nationalism in danger.’ People are told that if we are to achieve national freedom, we must maintain national unity, that all questions regarding reservations in the Legislatures, Executives and the public services are inimical to national unity and therefore for anyone interested in national freedom it is a sin to stand out for such reservations and create dissensions. 

That is the attitude of the governing class. It stands in glaring contrast with that of the governing class in Japan. Far from sacrificing its privileges for nationalism, it is exploiting nationalism to preserve them. The governing class in India does not merely refuse to surrender its power and authority; it never loses an opportunity to pour ridicule on the political demands of the servile classes.’

- Vishwratna.Dr Babasaheb Ambedkar...✍️📚
【Ref:vol 9, BAWS.】
थँक्स- Gaurav Somwanshi
-----------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!