डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ...बाहेर देशात पोहचवणारे राजू कांबळे...!!

राजकुमार दौलतराव कांबळे.... ४ जानेवारी 1954 रोजी बाबासाहेबांनी दिक्षा दिलेल्या भुमीत म्हणजेच नागपुर,महाराष्ट्र येथे सरांचा जन्म झाला.. राजु कांबळे एक निर्भीड, दुरदृष्टी असलेल व्यक्तीमत्व त्यांची ओळख..एक दिग्गज आंबेडकरवादी तसेच आपल्या मताशी ठाम असणारे म्हणुन त्यांना जाणल जायच. त्यांच समाजोद्धाराच कार्य हे पिचलेल्य-शोषित, वंचित वर्गांसाठी होत. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या सर्व आंबेडकरवादी लोकांमधले ते एकमेव दुवा म्हणुन काम करायचे. सर्वांना एकत्रित करण्याच मोठ काम त्यांनी केल.. सर्वांना आकर्षित करणार व्यक्तीमत्व, विद्वत्ता, मनमिळाऊ गुण, मैत्रेयी वृत्ती, निस्वार्थीपणा, स्वाभिमानी,समाजासाठी अचुक निर्णयी योगदान, प्रचंड इच्छाशक्तीने आंबेडकरवादी चळवळ पोहचवण्याच काम सरांनी केलय... एक संशोधक म्हणून काम करत असताना.. राजु कांबळे सर एक यशस्वी केमिकल इंजिनियर होते. LIT, नागपूर मधुन केमिकल इंजिनियरिंगची डिग्री व तसेच IISc, बेंगलोरलमधुन केमिकल इंजिनियरिंगची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री त्यांनी प्राप्त केली. अमेरिका, कॅनडा, इटली, U.A.E, आणि मलेशिया सारख्या देशात ते अॉईल एक्स्पलोरेशन आणि पेट्रोकेमिकल्...