२६ नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन... व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर१९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत केलेले उद्बोधक भाषण .. !!
1】 लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन सुरक्षित ठेवायचे असेल तर...
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात आंबेडकरांनी भारतापुढील ज्या समस्यांचा उहापोह केला आहे, त्याचे स्वरूप आजही बव्हंशी तसेच आहे. आज, 26 नोव्हेंबर. 'संविधान दिन. त्यानिमित्ताने या भाषणाचा हा अंश...
माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.
…केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.
तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की, केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्त्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.
आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्त्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या ‘अमेरिकन कॉमनवेल्थ’ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरून कळून येईल.
ब्राईसच्याच शब्दात मी उदधृत करू इच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करून त्यात सर्व लोकांसाठी असलेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.”
ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. ‘भारतीय राष्ट्र’ म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की, आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्रनिर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.
…स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते तर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत. जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.
【Ref : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६】
------------------------------------------------------------------------------------------------------------------
2】 !! भारतीय संविधान गौरव दिन..!!
25 नोहेंबर 1949 रोजी घटना समितीने केलेल्या प्रचंड जयजयकारात वादविवादाला उत्तर देण्यासाठी राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार"डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करण्यास उभे राहिले.
राज्यघटनेच्या गुणांविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यघटनेत गुंफलेली तत्वे ही चालु पिढीची मते आहेत.आणि माझे हे विधान कदाचित अतिरंजित वाटले तर हे ह्या सभागृहाचे मत आहे असे मानावे.राज्यघटना कितीही चांगली वा वाईट असली तरी शेवटी ती चांगली की वाईट हे ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर करतील त्यांच्यावर अवलंबून राहिल. राष्ट्राच्या भवितव्यतेचा विचार करून त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ते म्हणाले, माझ्या मनाला अतिशय दुःख होते ते ह्या गोष्टीमुळे की, भारताला यापुर्वी आपले स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली नाही.परंतु ते भारताच्या जनतेच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळे, देशद्रोहीपणामुळे त्याला गमवावे लागले.
→जेंव्हा महंमद बीन कासीमने सिंधवर स्वारी केली तेंव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने महंमद बीन कासीमच्या मुनीमाकडून लाच खाऊन आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे साफ नाकारले.
→महंमद घोरीला हिंदूस्थानवर स्वारी करण्यास आमंत्रण देणारा जयचंद हा पुरूष होय.त्याने महंमद घोरीला सोळंकी राज्याचे आणि आपले सहाय्य देण्याचे वचन दिले होते.
→जेव्हा शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करीत होते, तेव्हा इतर मराठे सरदार व रजपूत मोगल बादशाहाच्या बाजूने लढत होते.
→जेव्हा शीख राज्यकर्त्यांविरूद्ध ब्रिटिश लढत होते, तेंव्हा त्यांचे सेनापती मूग गिळून बसले होते.शीखांचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी त्यांनी मुळीच प्रयत्न केले नाहीत.1857 साली हिंदूस्थानच्या मोठया विभागाने ब्रिटिशांविरूद्
ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारले असता शीख लोक ते युद्ध शांतपणे प्रेक्षक वृत्तीने पाहत राहिले.
इतिहासाची पुनारावृत्ती होईल का? असे सभागृहात विचारून ते म्हणाले, 'हिंदू लोकांचे जातिभेद आणि पंथभेद ह्या जुन्या शत्रुमध्ये एकमेकांच्या विरूद्ध असलेल्या नवीन पक्षाची आणखी भर पडली आहे. ह्या जाणीवेमुळे माझी चिंता दुणावली आहे.' म्हणून भारतीय जनतेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असा इशारा दिला की,→जर त्यांनी आपल्या पक्षाचे मत राष्ट्रहिताच्यापेक्षा श्रेष्ठ मानले तर, भारतीयांचे स्वातंत्र्य दुस-यांदा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचे नष्ट होईल.
तरी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे.हे अमोल बोल एकुन सभागृहाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा जयजयकार केला.यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या मार्गाने लोकशाहीचे समर्थन करावे या विचाराकडे वळले.ते म्हणाले, लोकांनी पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, आपले सामाजिक आणि आर्थिक हेतु साध्य करताना घटनात्माक साधनांचा मार्ग स्वीकारला पाहिजे.असहकाराचे, कायदेभगांचे नि सत्याग्रहाचे मार्ग त्यांनी सोडून द्यावे.कारण घटनाबाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकाचे व्याकरण होय.
{2} →स्वातंत्र्याला दुसरा धोका लोकांच्या विभूतिपूजेतून निर्माण झाला आहे, असे सांगुन त्यांनी जाॅन स्टूअर्ट मिल या ब्रिटिश तत्ववेत्त्याच्या मताची सभागृहाला आठवण दिली.त्या ब्रिटिश तत्ववेत्त्याने लोकशाहीच्या संरक्षकांस असा इशारा दिला की, एखादा माणुस कितीही थोर असला तरी त्याच्या चरणावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये किंवा आपल्या संस्थेचा नाश करण्यास तो समर्थ होईल एवढी मोठी सत्ता त्याच्या स्वाधीन करू नये.देशात प्रचलित असणा-या निर्बृद्ध आणि आंधळया विभूतिपूजेविरूद्ध डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा देताना म्हटले, 'ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्राची सेवा केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही.परंतु त्या कृतज्ञतेस काही मर्यादा असते.आयरिश देशभक्त ओकानेल यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या आत्मप्रतिष्ठेचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही...
★आपल्या शीलाचा बळी देऊन कोणीही स्त्री कृतज्ञ राहू शकत नाही.
★आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कुठलेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही.
दुस-या कोणत्याही देशापेक्षा भारतात ही सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.कारण भारतामध्ये राजकारणात विभूतीपुजेचा इतका जबरदस्त परिणाम होतो की, तसा परिणाम जगातील कोणत्याही दुस-या देशाच्या राजकारणात होत नाही.धर्मामध्ये भक्ती ही आत्म्याला मुक्ती मिळविण्याचा मार्ग असू शकेल.परंतु राजकारणात भक्ती अथवा विभूतिपुजा हा अधोगतीचा आणि अंती हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे म्हणून समजावे.
{3} भारतीय लोकशाहीचे संरक्षण करताना भारतीयांनी तिसरी गोष्ट केली पाहिजे ती ही की, त्यांनी राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट राहू नये.राजकीय लोकशाहीचे त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे.राजकीय लोकशाही ही जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही, तर ती टिकूच शकणार नाही.कारण सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव ही जीवणाची तत्वे म्हणून ओळखते.स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव ही एक अखंड आणि अभंग अशी त्रिमुर्ती आहे.
जर सामाजिक समता नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थ मुठभर लोकांचे जनतेवर राज्य असणे असा होईल.
जर समता ही स्वातंत्र्यशून्य असेल, तर ती व्यक्तीच्या जीवनातील स्वयंप्रेरणा नष्ट करील.
★जर बंधुभाव नसेल तर स्वातंत्र्य आणि समता यांची वाढ साहजिकपणे होणार नाही.
हिंदी जनतेने एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की हिंदी समाजात दोन गोष्टींचा अभाव आहे.त्या दोन गोष्टी म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक समता या होत.आपल्या आवेशयुक्त भाषणात देशाला धोक्याची सूचना देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले....
26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल.पण सामाजिक आणि आर्थिक जीवणात असमता राहिल.जर ही विसंगती आपण शक्यतो लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ज्यांना विषमतेची आच लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उध्वस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत.शेवटी त्यांनी भारतीयांना असे आवाहन केले की, ज्या जातिभेदामुळे सामाजिक जीवणात तट पडले आहेत आणि जातीजातींत मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातिभेदाचा त्याग करून भारतीयांनी सामाजिक आणि भावनिक अर्थाने एक राष्ट्र बनावे.
¤डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 40 मिनिटे चाललेले हे मधुर, अस्खलित नि भविष्यवाणीने भरलेले ऐतिहासिक भाषण ऐकताना सर्व घटना समिती तल्लीन झाली होती.मधून-मधून ती डाॅ आंबेडकरांचा जयजयकार करीत होती.डाॅ.आंबेडक
रांचे ते भाषण म्हणजे भारताच्या प्रचलित राजकिय परिस्थितीचे यथातथ्य आणि वास्तव चित्र आहे, असे त्या भाषणाचे वर्णन करण्यात आले...
【Ref:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
लेखक:धनंजय किर.....】
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
3】 आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाच्या मागण्यांचा पूर्ततेसाठी आपण घटनात्मक कार्यशैलीचा उपयोग करावा अशी ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. याचा अर्थ सामूहिक कायदेभंग,असहकार, आणि सत्याग्रह हे मार्ग आता आपण निर्धारपूर्वक सोडून दिले पाहिजेत.ज्या काळी सामाजिक व आर्थिक मागण्यांचा पूर्ततेसाठी असे घटनात्मक मार्ग उपलब्ध नव्हते त्या काळी कायदेभंगाचे मार्ग चोखळणे अनिवार्य होते आणि उचितही होते. पण आता घटनात्मक पध्दतीचे मार्ग उपलब्ध झाले असताना, अश्या घटनाद्रोही मार्गाचा अवलंब करणे अनुचित आणि निषेधार्थ आहे. अशा घटनाद्रोही मार्गाचा अवलंब करणे म्हणजे भारताचे प्रजातंत्र मोडीत काढून प्रजातंत्राच्या पराभवाचे पर्व सुरू झाल्याची लक्षणे आहेत...
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर....✍️📚
【Ref: २५ नोव्हेंबर १९४९ कॉन्स्टिट्युशन ऍसेंम्बलीत झालेलले भाषण.. 】
------------------------------------------------------------------------------------------------------------------
4】 स्वतंत्र आणि सार्वभौम भारत राष्ट्राच्या लिखित स्वरूपातल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांनी २५ नोव्हेंबर१९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत उद्बोधक भाषण केले. ते त्यांच्या थोर देशभक्तीचे आणि अपार राष्ट्रप्रेमाचे आनंददायक प्रतिक होते.
'आपल्या रक्ताच्या अखेरच्या थेंबासह आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा निश्चय केला पाहिजे.' हा डॉ. बाबासाहेबांचा विचार आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सतत प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यातच आपले हित आहे. आपले स्वतंत्र्य सुरक्षित रहाणे अत्यंत महत्वाचे आहे.
लोकशाहीप्रधान राजकारणात 'एक माणूस एक मत आणि एक मत एक मुल्य' हे तत्व अतिशय महत्वाचे आहे. एक मत हे आपल्या ईच्छेनुसार लोकहिताचे सरकार बनविण्याचे आणि बदलण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच मतदात्याने आपल्या भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकहितकारी सरकार निवडून आणण्यासाठी आपल्या मताचा म्हणजेच सामर्थ्याचा विचारपूर्वक उपयोग करावा. हा जो बाबासाहेबांचा विचार आहे तो भारताची लोकशाहीप्रधान राज्यघटना सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारानुसार बंधुत्व हे जीवनमूल्य स्वातंत्र्य,समता, समाज आणि राष्ट्र या सर्वांसाठी महत्वाचे आहे. बंधुत्वाच्या मुळाशी जो आपलेपणा आहे तो सर्व भेदांवर मात करून सर्वांच्या स्वातंत्र्याला महत्व देतो; सर्वांच्या हितासाठी विषमतारहित समतेचा स्वीकार करतो; समाजाला एकसंघ बनवून एकातानिष्ठ आणि बलशाली बनवू शकतो.
स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्यावर म्हणजेच भारतीयांवर ज्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पडल्या आहेत,त्या कर्तव्यबुद्धीने सांभाळल्या जाव्यात; असे जे बाबासाहेबांनी सुचविले आहे ते हि राष्ट्र हिताचेच आहे. म्हणून बाबासाहेबांचे भाषण (विचार) सदैव स्मरणात ठेवावे असेच आहेत. आपल्या राष्ट्रप्रेमी स्वभावामुळे डॉ. बाबासाहेबांना ऐक्य, संघटन, समता,बधुत्व आणि स्वातंत्र्य अतिशय प्रिय होते. म्हणून त्यांनी स्वतंत्र भारताला कसलाही धोका होऊ नये अशी खबरदारी घेण्यास सुचविले.
२६ नोव्हेंबरच्या १९४९ रोजीच्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे भाषण झाले. त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब यांचेबद्धल गौरवोद्गार काढले. 'स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली तिचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकरांची निवड करण्याचा निर्णय घटनासमितीने अचूक घेतला व डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिध्द केला आहे' असे बोलून यथोचित गौरव केला.त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार घटना समितीने टाळ्यांच्या कडकडाटात राज्यघटनेला मान्यता दिली आणि बाबासाहेबांचे घटनानिर्मितीचे कार्य पूर्ण झाले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार आणि जगातले एक महान घटनाकार सिद्ध झाले.
…................................................
डॉ. बाबासाहेबांना कायद्याचे आणि घटनेचे आगाध ज्ञान होते. त्यांनी विविध देशांच्या घटना आणि कायद्यांचा सविस्तर अभ्यास केला होता. त्यांनी कायदा आणि घाटनांविशायक प्रसिध्द आणि महत्वपूर्ण ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी भारताचा १९३५ चा कायदा तयार केला जात असतांना आपल्या घाटनाविशायक ज्ञानाच्या जोरावर समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टीने महत्वाचा सहभाग घेतला होता. त्यांचे सर्व ज्ञान घटनेचा मसुदा तयार करतांना त्यांना उपयोगी पडणारे होते..
.......................................................
डॉ. बाबासाहेबांना घटना समितीचे सभासद,मसुदा समितीचे अध्यक्ष, स्वतंत्र भारताचे पहिले विधीमंत्री (minister of law ) करण्यात आले. हे मोठे मोठे सन्मान त्यांना त्यांच्या व्यासंगी,ज्ञानी भाषानीपूण विद्याविवेचननिष्णात व राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्वाच्या उज्वल वैशिष्ट्यांमुळेच मिळाले होते. त्याचे व्यक्तिमत्व असाधारण होते, लोकोत्तर होते..
.....................................................
डॉ. बाबासाहेबांना कायद्याचे आणि घटनेचे आगाध ज्ञान होते. त्यांनी विविध देशांच्या घटना आणि कायद्यांचा सविस्तर अभ्यास केला होता. त्यांनी कायदा आणि घाटनांविशायक प्रसिध्द आणि महत्वपूर्ण ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी भारताचा १९३५ चा कायदा तयार केला जात असतांना आपल्या घाटनाविशायक ज्ञानाच्या जोरावर समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टीने महत्वाचा सहभाग घेतला होता. त्यांचे सर्व ज्ञान घटनेचा मसुदा तयार करतांना त्यांना उपयोगी पडणारे होते..
.................................................
डॉ. बाबासाहेबांचे इग्रजी भाषेवर प्रभुत्व होते घटनेचा मसुदा इंग्रजी भाषेतच तयार करावयाचा होता. ते बोलण्यासाठी आणि लेखन करण्यासाठी इंग्रजी भाषेचा हवा तसा वापर करण्यात वाकबगार होते. अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल अशा पद्धतीनेच ते इंग्रजी भाषेचा उपयोग मोठ्या कौशल्याने करीत असत. ग्रंथांच्या विषयांना शोभेल अशीच इंग्रजी भाषा वापरून त्यांनी आपले ग्रंथ लिहिले होते. तसेच कायद्याला अनुकूल इंग्रजी भाषेचा उपयोग करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांचे अशा प्रकारचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्वही घटनेचा मसुदा लिहितांना उपयोगी पडणारे होते..
.................................................
डॉ. बाबासाहेब हे विषयाचे मुद्देसूद विवेचन व लेखन करण्यात चतुर होते हे त्यांनी विविध विषयांवरील मार्मिक ग्रंथ लेखन करून सिध्द केलेच होते. त्यांनी एम. ए., पी. एच. डी.,एम.एस्सी.,डी. एस्सी. या अशा उच्च पदव्यांचे शिक्षण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिटात आणि इंग्लंड मधील लंडन विद्यापिटात घेत असतांना इंग्रजी भाषेत संशोधनात्मक ग्रंथ लेखन केले होते. त्या ग्रंथांमध्ये त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचे मुद्देसूद, साधार आणि नवीन दृष्टीकोनानुसार विवेचन केले होते.म्हणूनच ते या उच्च पदव्या मिळविण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी समाज, मानववंश, धर्म, राजकारण, इत्यादी विषयी उत्तम इंग्रजी भाषेतून लेखन केले. डॉ. बाबासाहेब यांचे उत्तम इंग्रजी भाषेत मुद्देसूद, साधार आणि नवीन दृष्टीकोनानुसार विशायाव्हे विवेचन करीत ग्रंथलेखन करणे, हे स्वतंत्र भारताच्या घटनेचा मसुदा तयार करतांना आणि लिहितांना अतिशय उपयोगी पडणारे होते..
................................................
डॉ. बाबासाहेब यांच्या प्रखर राष्ट्रप्रेमी आणि महान देशभक्त असण्याविषयी आढळ विश्वास निर्माण झाला होता. त्यांनी १७ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीत जे दूरदृष्टीचे भाषण केले होते, त्या भाषणात त्यांनी भारताच्या विघटनात सर्वांचेच नुकसान आहे असे समजाऊन स्पष्ट सांगितले होते. अखंड भारतातच सर्व जातीच्या पंथाच्या आणि धर्माच्या लोकांचे हित आहे. आपल्या अशा सकारात्मक भूमिकेमुळेच डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या हितासाठी कधीही भारताच्या विघटनाची मागणी केली नाही. म्हणूनच विश्वासपूर्वक असे वाटत होते कि स्वतंत्र भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविधांगी उन्नतीचे अधिष्टान होऊ शकेल, अशी राज्यघटना निर्माण करू शकतील आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही या जीवनमुल्यांना केंद्रास्थांनी ठेवून लोकहितकारी व देशहीतकारी राज्यघाटना तयार करण्यात अवश्य यशस्वी होतील असा समितीच्या सर्व सदस्यांना दृढ विश्वास होता..
.......................................................
टी. टी. कृष्णमाचारी (T.T.Krushnmachari ).. 'i am one of those in the housewho have listened to Dr.Ambedkar very carefully. I am aware of the amount of work and enthusiasm that he has brought to bear on the work of drafting this constitution. At the same time, i do realise that the amount of attention that was necessary for the puurpose of drafting a constitution, so important to us at this moment, has not been given to it by the drafting committee. The house is perhaps aware that of the seven member nominated by you. One had resigned from the house and was replaced One died and was not replaced, One was away in America and his place was not filed up and another person was engaged in state affairs. and there was void to that extent. One or two people were away from Delhi and perhaps reasons of health did not permit them to attend. So it happened ultimately that the burden of drafting this Constitution fell on Dr.ambedkar and have no doubt that we are grateful to him for having achieved this task in the manner which is undoubtedly commendable...
टी. टी. कृष्णमाचारी यांनी जी वस्तुस्थिती सांगितली होती ती वरून हेच सिद्ध होते कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरच स्वतंत्र व सार्वभौम भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते 'त्यांच्या सहा सहकार्यांपैकी एकाने राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला,एक अमेरिकेत राहू लागले, एक राज्यकारभारातच गुंतून राहिले होते, उर्वरित दोघे दिल्ली पासून दूर रहात होते आणि ते आजारपणामुळे मसुदा समितीच्या घटनानिर्मितीच्या कामकाजात हजर राहू शकत नव्हते. त्यामुळे शेवटी मसुदा तयार करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेबांनाच सांभाळावी लागली. आणि त्यांनी ते कर्तव्य नि:संशय स्तुत्य रीतीने साध्य केले आहे असे म्हणून आपण डॉ. आंबेडकरांचे आभार मानणे योग्यच आहे असे टी. टी. कृष्णमाचारी यांनी बोलून डॉ. बाबासाहेब यांनाच भारतीय घटनेचे शिल्पकार सिध्द केले आहे..
............................................
वकील फ्रेंक अंथनि असे म्हणाले - डॉ बाबासाहेबांनी 'मसुदारूप घटनेच्या मुळाशी असलेल्या तत्वांचे जे बांधेसूद व स्पष्ट विश्लेषण आपणाला दिले आहे त्याबद्धल मी त्यांचे अभिनंदंच केले पाहिजे ' असे म्हणत घटनाकार डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला..
..........................................
एस नागप्पा (S.Nagappa) म्हणाले :
''या घटनेचा मसुदा तयार करण्याचा त्रास एकट्याने पेलल्याबद्धल मी आदरणीय डॉ. आंबेडकरांचे आभार मानतो. ते काम अवघड आणि गुंता गुंतीचे आहे यात शंका नाही तरीही त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे पार पाडले..
..........................................
काझी सय्यद करीमुद्दिन :
मी विशेषकरून डॉ. आंबेडकर यांचे त्यांच्या विद्वत्तापूर्ण वकिली आणि मसुदारूप घटना तयार करण्यात घेतलेल्या कामाबद्धल आभार मानतो आणि अभिनंदनही करतो..
.........................................
पंडित ठाकूरदास भार्गव :
डॉ. आंबेडकर यांनी घटना तयार करून आमच्या हृदयामध्ये उच्च स्थान तयार केले आहे..
............................................
जय भिम.. जय संविधान... !
लेख-विवेक घटविलकर...✍️
---------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment