डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ...बाहेर देशात पोहचवणारे राजू कांबळे...!!


राजकुमार दौलतराव कांबळे....
४ जानेवारी 1954 रोजी बाबासाहेबांनी दिक्षा दिलेल्या भुमीत म्हणजेच नागपुर,महाराष्ट्र येथे सरांचा जन्म झाला.. राजु कांबळे एक निर्भीड, दुरदृष्टी असलेल व्यक्तीमत्व त्यांची ओळख..एक दिग्गज आंबेडकरवादी तसेच आपल्या मताशी ठाम असणारे म्हणुन त्यांना जाणल जायच. त्यांच समाजोद्धाराच कार्य हे पिचलेल्य-शोषित, वंचित वर्गांसाठी होत. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या सर्व आंबेडकरवादी लोकांमधले ते एकमेव दुवा म्हणुन काम करायचे. सर्वांना एकत्रित करण्याच मोठ काम त्यांनी केल.. सर्वांना आकर्षित करणार व्यक्तीमत्व, विद्वत्ता, मनमिळाऊ गुण, मैत्रेयी वृत्ती, निस्वार्थीपणा, स्वाभिमानी,समाजासाठी अचुक निर्णयी योगदान, प्रचंड इच्छाशक्तीने आंबेडकरवादी चळवळ पोहचवण्याच काम सरांनी केलय...
एक संशोधक म्हणून काम करत असताना.. राजु कांबळे सर एक यशस्वी केमिकल इंजिनियर होते. LIT, नागपूर मधुन केमिकल इंजिनियरिंगची डिग्री व तसेच IISc, बेंगलोरलमधुन केमिकल इंजिनियरिंगची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री त्यांनी प्राप्त केली. अमेरिका, कॅनडा, इटली, U.A.E, आणि मलेशिया सारख्या देशात ते अॉईल एक्स्पलोरेशन आणि पेट्रोकेमिकल्स सारख्या महत्वाच्या क्षेत्रात ते सिनीयर प्रोसेस इंजिनिअर म्हणून गेली 37 वर्षे काम करत होते...
सरांची खरी ओळख ही त्यांच्या चळवळीत दिलेल्या योगदानामुळे आहे. अथक परिश्रम आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेतून त्यांना डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल मिशन इंक. (AIM ) या संघटनेची स्थापना करता आली. तुम्ही जगात कुठे ही राहात असाल.. पण बाबासाहेबांच राहिलेल काम पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या लोकांनी खांद्यावर घेऊन समाजासाठी व आंबेडकरी विचारांची परतफेड करणे हाच त्यांच उद्देश आणि विश्वास होता..
हेच त्यांच म्हणणं आणि विश्वास आंबेडकरवादी लोकांच्या मनात रुजुन बसल. आणि हेच रुजलेल प्रेम AIM ला अंतराष्ट्रीय पातळीवर २४ वर्षे एकत्रित व अखंडित ठेवण्यात यशस्वी झाल. याच AIM च्या माध्यमातून पुढे kuala lumpur, Malaysia (1998) आणि (2011),Paris, France (2014) आणि आता पुढे जपान (2018) होणारे आंबेडकरी परिषदेच आयोजन करता आल. जपानच्या परिषदेच कार्य पुर्ण जोमात सुरू आहे. सरांच्या नेतृत्वाखाली US, Canada, Japan, Middle East, आणि संपूर्ण यूरोपात AIM पसरवण्याचा अध्याय दिला..
बाबासाहेब शिकलेल्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांच्या स्मरणार्थ Annual Dr. Ambedkar memorial lecture, 2009 पासून Asia institute /Barnard college यांच्या संलग्न आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सरांचाही खुप मोठा सहभाग आहे..
बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठात प्रवेश (1913))घेऊन 2013 मध्ये शंभर वर्षे पुर्ण झाल्याबद्दल बर्नार्ड कॉलेज मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सच आयोजन सरांनी केल होत.महत्त्वाच म्हणजे हा लॅन्डमार्क दलितांसाठी टर्निंग पॉईंट ठरलेला. University of Calgary येथेसुद्धा होणाऱ्या Ambedkarite memoriol lectures मध्ये सुद्धा त्यांचे विशेष योगदान आहे. नागपुर मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्समुळे देशातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व बौद्धांना एकत्रित संपर्क करता आल. त्यांच महत्त्वाच शेवटच कार्य म्हणजे बाबासाहेबांची 125 वी जयंती कोलंबिया विद्यापीठात साजरी करणे. तसेच विद्यापीठात 2016 मध्ये बाबासाहेबांच स्मारक बसवणे.. हे कधीच विसरता येणार नाही...
राजु कांबळे सरांच्या संपूर्ण कार्य व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये दिसुन येत कि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व दलितांना आंबेडकरी विचारांच्या धारेत आणुन त्यांच जागतिक पातळीवर नेटवर्क तयार करणे होत. ते आंबेडकरी विचारांसाठी व बाबासाहेबांच लिखाण पसरवण्यासाठी स्वतःला झोकुन दिल होत.त्यांनी जगभरात बाबासाहेबांनी लिहिलेल्या खंडाना जगभरात पोहचवण्याच काम त्यांनी केल. AIM, सोबतच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवे नेतृत्व व आंतरराष्ट्रीय संघटना तयार झाल्या. हे फक्त नागलोकामध्ये मर्यादित न राहता Ambedkar association of texas, Ambedkar international center, equity labs, Friends for India's education, International commission on Dalit Human Rights, Ambedkar King study circle, India Solidarity Network, Boston Study Group, Federation of Ambedkarite व Buddhist organisation UK. अशा जागतिक आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व मिळाव यासाठी विशेष प्रयत्न केले.
समाजकार्या पलिकडे राजु सरांनी स्वतः वैयक्तिक कित्येक दलित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप व परिक्षांची फिस भरली आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना देशाबाहेर शिक्षण घेण्याची संधी मिळावी. त्यांच व त्यांच्या कुंटुंबाच तसेच समाजच आयुष्य घडाव हाच उद्देश. आता त्यांचा हाच वारसा त्यांचे विद्यार्थी संभाळत आहेत..
राजकुमार सर आपल्यात नाहीत व समाजाला पुढे नेण्याच काम राजकुमार विना अशक्य वाटत असल तरी आपण त्यांच व त्यांच्या कार्याला सन्मानित करत त्यांचा वारसा पुढे चालवत ठेवायला हव. त्यांच्या अकाली मृत्यू मुळे चळवळीत खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरी आपण त्यांना आपल्या विचारात ठेऊन त्यांच्या कार्यांतुन प्रेरणा घ्यायला पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबासाहेबांच्या अपेक्षित असलेला समाज पुढे नेण्याच काम आपण केल पाहिजे. ते मार्गदर्शक म्हणुन निरंतर पाठीशी राहीले त्यांच्या साठी हेच आदरांजली ठरेल.
जगातल्या सर्व आंबेडकरवादी समाज त्यांना व त्यांच्या कार्याला प्रेमयुक्त आदर व कृतज्ञता व्यक्त म्हणुन त्यांना सलाम करते. त्यांच्या सोबत त्यांच्या कुंटबियांच हि आभार. त्यांच सुद्धा चळवळीसाठी खुप मोठ योगदान आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था संपत नाही तोपर्यंत त्यांची आठवण येत राहील. त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा अंतःकरणाने आदर व धन्यवाद..
धन्यवाद... सर
जय भिम...

-RAKESH KUMAR...✍️
AMBEDKARITE ASSOCIATION NORTH AMERICA..
(via- Vinay Shende)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!