आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐
1】 भारताचा उध्दारकर्ता.. महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. -आचार्य प्र. के. अत्रे... !! पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युद्धाच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले कि, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणी भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दार करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबीराला हातपाय बांधून पाण्या...
Comments
Post a Comment