स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...!!!



स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!!!
(कधीच, कुठेही पुढे न आलेली बाजू)

आजही आपल्या अवतीभोवती अशी बरीच मंडळी आहे की माहितीचा अभाव किंव अवेअरनेस नसल्यामुळे गुंतवणूकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय निवडत नाहीत. शेअर बाजाराबद्दल सुस्पष्ट माहिती उपलब्ध असतानाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी धाडस होत नाही. पण जवळपास 107 वर्षांपुर्वी एका मराठी माणसाने स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी स्थापन केली होती. 

ज्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढन्यासाठी 2021 उजाडावं लागलं त्याच स्टॉक मार्केटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 107 वर्षांपुर्वी पाऊल ठेवलं होतं. 
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु आहेत. एकाच आयुष्यात त्यांनी फार वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. ज्या भूमिका आज सुद्धा आदर्श मानल्या जातात. ते एक उत्तम वक्ते होते, राजनेता होते, पत्रकार, संपादक, लेखक, संशोधक, समाजसुधारक होते, पण आज त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका पैलुबद्दल आपण बोलतोय. तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गुंतवणूक.

1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारतात परतले. आणि आल्यांतर लगेच त्यांनी 1917 साली एका कंपनीची स्थापना केली. कंपनीचं नाव होतं स्टॉक अँड शेअर्स कन्सल्टन्सी. कंपनीचं ऑफिस होतं दलाल स्ट्रिटवर. जिथे आज बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची भव्य इमारत उभी आहे. विषेश म्हणजे तेव्हा बाबासाहेबांचं वय होतं फक्त २६ वर्ष. इथं आजही आपले बाप लोकं एफडया काढू काढू परेशान आहेत. पण बाबासाहेबांनी इतक्या लहान वयात देशात इतकी सामाजिक प्रतिकुलता आणि आर्थिक विचारांबाबत सजगता नसतानाही काळाच्या किती पुढचा विचार केला हे कळतंय. जिथं स्टॉक मार्केट ही संकल्पनाच मुळात नवी आहे तिथं या माणसाने कन्सल्टन्सी उभी करणं क्रांतिकारी होतं. 

आजच्या काळात स्टार्ट अप वगैरे परवलीचे शब्द झालेयत. पण १०० वर्षापुर्वी बाबासाहेबांनी एक कंपनी स्थापन केली तिही शेअर मार्केटसंदर्भातली. म्हणजे त्यांचा आर्थिक विचार सुद्धा किती आधुनिक आणि प्रॅक्टिकल होता याची प्रचिती येते. स्वतःच्या आर्थिक नाड्या स्वतःच्या ताब्यात असाव्या इतका हा क्लीअर विचार होता. 

आजच्या काळात इतके सगळे सोर्सेस आणि माहितीचा भडीमार असतानाही शेअर मार्केटकडे वळण्याची अनेकांची हिंमत होत नाही किंवा अज्ञान आडवं येतं. पण सेन्सेक्स निफ्टी या शब्दांनी जन्म घेण्याचाही कित्येक वर्षे आधी बाबासाहेबांनी चक्क स्टॉक मार्केट कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली होती. काळाच्या पुढचा दृढ आर्थिक विचार करण्याची या माणसाची क्षमता यावरुन कळते.

सुरुवातीला स्टॉक मार्केट अँड शेअर्स या कंपनीने चांगला परतावा दिला. कंपनीचं काम जबरदस्त सुरु होतं. पण इथून १०० वर्षाआधी गुंतवणूक करणारे साहजिकच उच्चवर्णिय होते. पण नंतर ही कंपनी चालवणारी व्यक्ती दलित आहे हे समजल्यावर क्लायंट येणच बंद झालं आणि जातीय भेदभावामुळे ही कंपनी नंतर बंद पडली. हा भेदभाव झाला नसता तर बाबासाहेबांच्या स्टॉक मार्केट थेअरीज सुद्धा आपल्याला आज कदाचित वाचायला मिळाल्या असत्या.असो
बाबासाहेबांचा अजून एक इन्व्हेस्टमेंट चा अँगल होता. आता २०२४ मध्ये सुद्धा अनेकांना करन्सी ट्रेड हा काय प्रकार आहे हे माहिती नाही. अनेकांनी तर याबद्दल ऐकलंही नसेल. आज गुंतवणूकीसाठी इतके प्लॅटफॉर्म आणि शिकण्यासाठी सगळं उपलब्ध असूनही करंसी ट्रेडर तुम्हाला बोटावर मोजण्याइतकेच सापडतील. पण स्टॉक मार्केट सोबतच बाबासाहेबांना करंसी ट्रेडिंग सुद्धा यायचं.

एकदा बाबासाहेबांना गुंतवणूसाठी पैसे हवे होते. पण ते त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी त्यांचे पारसी मित्र नवल भाटेना यांच्याकडे २ हजार रुपये मागितले. आता तुम्ही म्हणाल कर्ज काढून गुंतवणूक कोण करतं. पण ज्याला रिस्क रिवार्ड आणि रेअर अपॉर्च्युनिटी, ग्लोबल इकोनॉमिक्स कळतं तो उधारीवर घेतलेल्या पैशातून सुद्धा भांडवल उभं करु शकतो हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं.(रिस्क है तो इश्क है) मुद्दा असा की येत्या काळात जर्मन चलनाचा भाव वाढेल याचा अंदाज बाबासाहेबांना आला होता. त्यासाठीच मित्राकडून घेतलेले पैसे त्यांनी गुंतवले आणि काही दिवसात खुप चांगलं प्रॉफिट त्यांनी कमवलं. आणि उधारीही फेडली.

त्यानंतर शाहजी महाराजांकडून त्यांनी २०० पौंड घेतले. पण यावेळेस रुपयाच्या तुलनेत पौंडचा भाव पडल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली.सामाजिक आघाड्यांवर लढत असताना आपण कंपनी काढावी किंवा आपला काहीतरी उद्योग असावा हा विचार किती क्रांतीकारी,व्हीजनरी होता...

बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली १९२४ मध्ये. त्याच्या उद्दिष्टांमध्ये उद्योजक तयार करणं, कृषी आणि औद्योगिक कौशल्यांसाठी प्रशिक्षण देणं हे सुद्धा होतं.बाबासाहेबांनी त्यांच्या मित्राला एक पत्र लिहीलं होतं आणि त्यात बाबासाहेबांचा मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद या दोघांना बँकिंग आणि किरकोळ व्यापार शिकवा असं म्हटल होत. 
इतकच नाही तर बाबासाहेबांनी त्यांचे मित्र वराळे यांना तंबाखुचा व्यवसाय उभा करण्यासाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली होती . इतकच नाही तर मालाला बाजारपेठ खरेदीदार मिळावे म्हणून त्यांनी अनेकांशी पत्रव्यवहार सुद्धा केली होता. चांगली आर्थिक स्थिती अनेक प्रश्न सोडवू शकते यावर त्यांचा विश्वास होता...

त्यामुळे बाबासाहेबांबद्दल बोलताना त्यांचा हा सुद्धा पैलु आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. 

-सौरभ कोरटकर...✍️💗

14 एप्रिल 2024

[ Ref: The neglected legacy- chakradhar indurkar] 

अधिक माहितीसाठी खाली एक लिंक देत आहे ती पहावी...

https://youtu.be/ZNH4gUowG-8?si=ku1uatIPngPoPbcQ

---------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली... !!💐💐

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!