डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन.. !!
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन.. !! समाज समता संघ: सप्टे १९२७ ला समाज समता संघाची स्थापना झाली. हिंदु धर्माती अस्पृश्य वर्गाला वेदमंत्रांचा अधिकार बहाल करण्यासाठी या संघानी काम चालू केले. यातून महारांचे वेदीक मंत्रानी लग्न लावण्याचे काम झपाट्याने सुरु झाले. या संघाची लोकं वेद मंत्रानी महारांच्या विधी उरकायचा सपाटा लावला. जिकडे तिकडे महारांमधे उत्साहाचे वितावरण दिसू लागले. या संघाचे सभासद आळीपाळीने एक दुस-या अस्पृश्य व स्पृश्य सभासदांकडे सहभोजन घडवुन आणत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार श्री. भा. वि. वरेकर यानी या कामासाठी स्वत:ला झोकुन दिले अन समतेचा धार्मिक नि वेदिक मंत्र-पुजा आघाडीचा धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अस्पृश्यनिवारणाच्या कार्यात उडी घेतली. तिकडे अमरावतीला गवई यानी याच वर्षी म्हणजे १९२७ च्या ऑगष्ट महिन्यापासुन अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह चालविला होता. काही झाले तरी मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे अशा हट्टाने ते पेटले होते. त्या आधी बाबासाहेबानी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यापासुन खेड्या पाड्यातिल लोकं प...