Posts

"धम्मचक्र प्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी" याचे महत्त्व...आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!!!

Image
1] ​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजीच धम्मदीक्षा का घेतली,? जाणून घ्या ऐतिहासिक कारणे...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ (विजयादशमी) या दिवशीच बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली, यामागची सामाजिक, ऐतिहासिक आणि बौद्ध परंपरेतील कारणे त्यांनी त्यांच्या भाषणात स्वतः स्पष्ट केली आहेत. याबाबतचा सर्वात ठोस पुरावा म्हणजेच १५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षासमारंभाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण होय. हे भाषण 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' (Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches - Vol. 18, Part 3) मध्ये आणि 'दीक्षाभूमी नागपूर' येथील अधिकृत नोंदींमध्ये उपलब्ध आहे. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर (विजयादशमी) हाच दिवस निवडण्यामागील पुराव्यासह मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: --- १. सम्राट अशोकाचा 'अशोक विजयादशमी'चा इतिहास (ठोस भाषण पुरावा) बाबासाहेबांनी १५ ऑक्टोबर १९५६ च्या भाषणात नागपूर येथे बोलताना स्पष्ट सांगितले होते की: "काही लोक मला विचारतात की तुम्ही धर्मांतरासाठी नागपूर शहर आणि विजयादशमीचाच दिवस का निवडला? याचे उत्...

महार रेजिमेंटचा, गौरवशाली,दैदिप्यमान इतिहास आणि पराक्रम...!!!

Image
1] महार रेजिमेंटचा, गौरवशाली,दैदिप्यमान इतिहास आणि पराक्रम...!!! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलच्या डिफेन्स ॲडव्हायझरी कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षांपासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी, यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले... १. महार रेजिमेंटची स्थापना आणि सुरुवातीचा टप्पा • १ ऑक्टोबर १९४१: लेफ्टनंट कर्नल जॉन्सन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची स्थापना बेळगाव (कर्नाटक) येथे करण्यात आली. • दुसरी बटालियन: दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टनंट कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी (नागपूर) येथे स्थापन झाली. • विशेष बिल्ला (Badge): त्यावेळेस महार रेजिमेंटच्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगावचा जयस्तंभ असणारे चिन्ह व त्यावर "Word Mahar" कोरण्यात आले होते. हे चिन्ह दुसऱ्या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते, जे...

दलित्त्वला(dalitality) नाकारणारे राजा ढाले सर...!!!

Image
1] ■ राजाराम पिराजी ढाले ■ (३० सप्टेंबर १९४० – १६ जुलै २०१९) राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथरचे आक्रमक नेते होते, ही संघटना ज.वि. पवार, अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांनी स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी फुले-आंबेडकरी विचाराचा पुरस्कार केला. राजा ढालेंचा जन्म ३० सप्टेंबर १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावी झाला. ते तरूण असतानाच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाले. त्यांनी सुरुवातीला 'प्रबुद्ध भारत'मध्ये लिखाण केले. पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज.वि. पवार, सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी 'लिटल मॅगेझिन'ची चळवळ सुरू केली होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय 'ब्लॅक पॅंथर' संघटनेच्या धर्तीवर 'दलित प...

आरक्षणाचे उपवर्गीकरण ; एक चिकित्सक अभ्यास...!!!

Image
1] आरक्षणाचे उपवर्गीकरण; एक चिकित्सक अभ्यास भाग 1...!!  आरक्षणाचे उपवर्गीकरण ही कल्पना म्हणजे संविधान निर्मात्यांनी आरक्षणाच्या संदर्भातील मूळ संकल्पनेशी प्रतारणा आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींचे व्यापक हित साधले जाणार नाही हे वास्तव आहे. तथापि काही राज्यात यापूर्वीच उपवर्गीकरण लागू करण्यात आले आहे. याचा संदर्भ देऊन उपवर्गीकरण समर्थक लोक ते कसे योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. काही पक्षीय दृष्टिकोन ठेवणारे, सनातनी आंबेडकरवादी लोक तेलंगणा आणि कर्नाटकचे उदाहरण देऊन कॉँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा युक्तिवाद करतात. उपवर्गीकरण समर्थक, विरोधक आणि सनातनी आंबेडकरवादी लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की,आरक्षणाचे उपवर्गीकरण हा विषय पक्षीय झापडे लावून किंवा निव्वळ कोणतीतरी एक बाजू घेऊन अभ्यासण्याचा नाही. हा विषय दलित चळवळीचे अस्तित्व, भविष्यातील परिवर्तवादी चळवळीची दिशा आणि सरंजामी-भांडवली-ब्राहणी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष यांच्याशी निगडीत आहे. यामुळे या विषयावर सखोल अभ्यास करून शोषित-वंचित समूहाचे विखंडन होणार नाही अशा प्रकारे हा विषय समजून घेतला पाहिजे....