डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!
1 】 माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो. हक्काचा मित्र असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. बाबासाहेब कोलंबियाहून परतले. चळवळीत पूर्णवेळ उतरण्याआधी त्यांनी स्वतःला एका चांगल्या वकिलाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आपली पूर्ण ताकद लावली. बाबासाहेब कित्येकदा सकाळी सात ला घरातून निघाले तर रात्री पार एक दोन वाजता घरी येत. अशातच त्यांना विधी महाविद्यालयात म्हणजे आजच्या जीएलसी (लॉ कॉलेज) ला व्याख्याता म्हणून काम करण्याचं निमंत्रण मिळालं. बाबासाहेबांनी ते स्विकारलं. कालांतराने ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले. पण हा किस्सा त्यांच्या व्याख्याते असण्याच्या कालखंडातला. त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे लेक्चर म्हटलं की, बाहेरच्या अनेक कॉलेजेस मधून विद्यार्थी, प्राध्यापक जातीनं हजेरी लावत. त्यांच्या व्याख्यानांच्या नोट्सवर अनेकदा बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये आर्टिकल छापून येत. खूप मोलाचे डॉक्युमेंट होते ते. पण कुणीही सांभाळून न ठेवल्याने आता ते उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांना या व्याख्यानांचं बऱ्यापैकी मानधन मिळायचं. मानधन मिळालं की, बाबासाहेब ते आणून सरळ रमाई...