घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !!
1】 घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !! घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !" १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर. २) एन.गोपालस्वामी अय्यंगार. ३) डी.पी.खेतान. ४) कृष्णास्वामी अय्यर. ५) बी. एल. मित्तल. ६) के. एम.मुन्शी. ७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३७९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत-पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्...