Posts

Showing posts from January, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुध्दीप्रामाण्यवादी पत्रकारिता व त्यांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी...!!!

Image
1】बाबासाहेबांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी.. !! अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला.... ‘इं ग्रजीपेक्षा मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण थोडे आहे हे खरे; तथापि ज्या बहिष्कृत वर्गात ते जन्मले त्या वर्गाच्या कैफियती मांडताना सर्वसामान्य साक्षर व्यक्तीलादेखील समजेल, अशी सुबोध भाषा त्यांनी वापरली आहे. जाडे पंडिती व लठ्ठ अवघड शब्द त्यात फारच थोडे आढळतात. पंडित असूनही विद्वत्तेचा अहंकार त्यांच्या भाषेत नाही. हिंदुधर्माला यापुढे तरी जगायचे असल्यास डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील हे मत बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकणारे आहे. ‘मराठी भाषेसंबंधी बोलताना जे फक्त साहित्याच्याच क्षेत्रात असतात, त्यांच्याच शैलीचा उल्लेख होतो. पण सरल प्...