Posts

Showing posts from January, 2025

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन...आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान...!!!

Image
1】 प्रजासत्ताक कुणा मुळे? सन १९४६, भारतीय संविधान समिती तयार करण्यासाठी, सर्व प्रांतीय विधानसभा मतदार संघातून सभासद निवडले जाणार होते. डॉ. आंबेडकरांना भारताच्या नव्याने तयार होणाऱ्या संविधान समितीत प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती परंतु "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" या त्यांच्या पक्षाचा मुंबई प्रांतातून कुणीही प्रतिनिधी नसल्याने हि शक्यता धुसर वाटत होती. नव्याने तयार होणारे स्वतंत्र भारताचे संविधान हे सर्व अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाज समूहासाठी फायद्याचे असले पाहिजे म्हणून सर्व घटकातील प्रतिनिधी त्या समितीत असावे असे त्यांना वाटत होते. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या सांगण्यावरून तत्कालीन बॉम्बे प्रांताचे मुख्य मंत्री खेर यांनी बाबासाहेब बॉम्बे प्रांतातून निवडून जाणार नाहीत अशी चोख तयारी केली होती. सरदार पटेल स्वतः आंबेडकरांना कसं रोखता येईल यावर लक्ष ठेऊन होते अर्थात कॉंग्रेस सुप्रीमो कडून आलेल्या या सूचना असतील. डॉ. आंबेडकरांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांनी कोंग्रेसी दलित चेहऱ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्यापैकी एक जगजीवन ...