Posts

Showing posts from December, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली...!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?यशवंत मनोहर...!!! डॉ. यशवंत मनोहर विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ‘डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?’ ही पुस्तिका २००५ साली प्रकाशित झाली आहे. नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित मजकूर… मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६).  या ठिकाणीच मांडल्या गेलेल्...