इतिहासाची दिवाळखोरी - काल्पनिक चाणक्य...!!!
इतिहासाची दिवाळखोरी - काल्पनिक चाणक्य...!!! शालेय किंवा विद्यापीठीय स्तरावर अनेक वेळा आपण वाचले असेल की धनानंद राजाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्त मोरियाला योग्य ते शिक्षण देऊन, त्याला राज्य स्थापन करून दिले. म्हणजेच चाणक्य हा चंद्रगुप्त मोरियाचा गुरू होता! पुढे असेही लिहिले आहे की चाणक्यामुळे मोरियांची सत्ता वाढली आणि चंद्रगुप्त मोरिय एक दिग्विजयी राजा झाले. अशीही मान्यता आहे की चाणक्य हा सम्राट अशोकांचा देखील गुरू होता! भारतात आमच्या शिवाय इतर कुठलीही संस्कृती श्रेष्ठ नसून, आम्हीच इथले करते धरते आहोत असा समज इथल्या काही लोकांचा आहे! त्यामुळे इतर संस्कृतीतील अनेक संदर्भ "ह्यांनी" हवे तसे बदलले आणि लिहिले देखील. त्याच बरोबर अनेक शतकांचा प्रचार केल्यामुळे लोकांच्या मनात हे "श्रेष्ठत्वाचे" चित्र रंगविले गेले आहे. वर्तमान काळात नवीन संशोधन होत असल्यामुळे, या लोकांनी स्वतःच्या काल्पनिक नायकांचे अथवा संस्कृतीचे ओढून ताणून जे श्रेष्ठत्व दाखविले होते, त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे! चाणक्य बद्दल जी काही माहिती मिळते ती त्याने लिहिलेली...