Posts

Showing posts from June, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार.... !!!

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार... !! गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख कळविली. बाबासाहेब येणार म्हणून  स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते  करुन अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या. बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या मैद...

सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व...!!

Image
1】 सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व...!! जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले. जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले.अशोकांच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिङ्ग युद्धात खूप सैनिक मारले गेले, तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एव्हढे प्रचंड सैन...

कश्मीर प्रश्नावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार...व त्यांनी 370 अनुच्छेद ला केलेला विरोध...!!!

Image
1] कश्मीर प्रश्नावर नेहरूंनी जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर…? 1) आंतरराष्ट्रीय राजकारणात "परराष्ट्र धोरण" हे अत्यंत महत्त्वाचे असते. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जग दोन गटांत विभागले गेले – अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सत्तेचा ताबा काँग्रेसकडे गेला. पंडित नेहरूंनी कोणत्याही गटात न जाता ‘अलिप्ततावाद’ स्वीकारला. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या धोरणाचे स्पष्टपणे विरोधक होते. 2) त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता, “जर उद्या चीनने भारतावर आक्रमण केलं, तर रशिया आपल्याला मदत करणार नाही कारण आपण त्यांच्या गटात नाही, आणि अमेरिका देखील मदत करणार नाही कारण आपण त्यांच्या गटातही नाही.” बाबासाहेबांचं हे राजकीय भाकीत अचूक ठरलं – 1962 मध्ये चीनने आक्रमण केलं, आणि भारत एकटा पडला. 3) कश्मीर प्रश्नाची पार्श्वभूमी: ब्रिटिशांनी भारत सोडताना संस्थानिक राजे-राजवाड्यांना तीन पर्याय दिले: A. भारतात सामील होणे B. पाकिस्तानात सामील होणे C. स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहणे बहुतेक संस्थानिकांनी भारत ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३ भाषांचे ज्ञान होते…!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३ भाषांचे ज्ञान होते…! ------------------------------------------------------------------------------  ज्ञान मिळवण्यासाठी प्रचंड भूक असावी लागते, ज्या भाषेमध्ये ज्ञान उपलब्ध आहे ती भाषा अवगत केली. इंग्रजीमध्ये ज्ञान आहे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले, भारताचा प्राचीन इतिहास आणि धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी संस्कृत /पाली/ प्राकृत या भाषा अभ्यासल्या. संघटन वाढवण्यासाठी गुजराती /कन्नड/ बंगाली/ उर्दू /हिंदी या भाषा शिकल्या. जागतिक पातळीवरचे ज्ञान संपादन करण्यासाठी फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकल्या. विद्यार्थीदशेत पर्शियन भाषा शिकली. ज्ञानासाठी प्रचंड कष्ट उपसलेले व्यक्ती म्हणजे The Symbol of Knowledge डॉ बाबासाहेब आंबेडकर... 1) मराठी: मराठी ही बाबासाहेबांची मातृभाषा. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी सुरू केलेली सर्व वृत्तपत्रे ही मराठी भाषेतच होती. मूकनायक(1920), बहिष्कृत भारत(1927), जनता(1930), समता(1928) प्रबुद्ध भारत(1956) ही त्यांची वृत्तपत्रे मराठीतूनच प्रकाशित झाली, ज्यामध्ये त्यांनी अग्रलेख लिहिले. सार्वजनिक भाषणं, पत्रव्यवहार व लेखन यामध्ये मराठी ...