Posts

Showing posts from February, 2024

बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास रमाई... (रमाईला शेवटचा निरोप) व बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाई ला लंडन हुन लिहलेलं पत्र.. !!

Image
1】डॉ. बाबासाहेब(रमाईला शेवटचा निरोप) बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास........ रमाई अडचणी अन बाबासाहेब हे समिकरण आता बाबासाहेबांच्या शेवट पर्यंत चालणार हे बाबासाहेब जाणून चुकले होते. अत्यंत सोपं काम सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणानी आव्हान बनुन उभं ठाकायचं. नंतर बाबासाहेबानी भीम शस्त्र उपसायचे अन त्या आव्हानाला सामोर जायचं. आपली सर्व शक्ती पणाला लावून अशा आव्हानाना लोळवायचं अन विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध करायचं याची मालिका आता अखंडपणे चालू होती. सामोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्याची अंगभूत क्षमता अन आव्हान स्विकारण्याच्या वृत्तीमूळे जागोजागी बाबासाहेबांचा जयजकार होई. हे सर्व चालू असताना एक अत्यंत महत्वाची घट्ना घडते. बाबासाहेबाना पूरुन उरणारी ही घटाना मात्र बाबासाहेबांचं पुरतं नामोहरम करून सोडते. प्रत्येक ठिकाणी विजय खेचून आणणारा हा वीर ईथे मात्र हताशपणे पराजय पत्कारतो. ती घटना म्हणजे बाबासाहेबांची जिवनसंगिनी रमाई बाबासाहेबानी आयूष्याच्या प्रवासात अर्ध्या वाटेत सोडून जाते अन बाबासाहेब त्याना थांबविण्यात सर्वस्वी अपयशी ठरतात. केवळ हताश होऊन आपल्या परमप्रिय प...