डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार.... !!!
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार... !! गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख कळविली. बाबासाहेब येणार म्हणून स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते करुन अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या. बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या मैद...