धर्म बौद्ध, ओळख अनुसूचित: जनगणनेतील जातनोंदणी एक 'स्ट्रॅटेजिक आयडेंटिटी...!!!
धर्म बौद्ध, ओळख अनुसूचित: जनगणनेतील जातनोंदणी एक 'स्ट्रॅटेजिक आयडेंटिटी...!!! 1] जनगणना, जात आणि धर्म - सुनील खोब्रागडे सर... बौद्धांनी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत काय नोंद करावी यावर गोंधळ घालणे पुन्हा सुरु झाले आहेत. मी सन २०११ पासुन आतापर्यंत सातत्याने या विषयासंदर्भात सविस्तर लेख लिहून बौद्ध धर्माचे हित कशात आहे याची मांडणी करीत आलो आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, तसेच बौद्धांमधील अनेक माजी सनदी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,लेखक पत्रकार तसेच सामान्य बौद्धांनी जनगणनेत धर्माच्या रकण्यात बौद्ध व जातीच्या रकाण्यात धर्मांतरपूर्वीची जात (महार इ.) नोंदवावी अशी भूमिका घेतली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, काही अतिहुषार, टोकदार अस्मितावादी बौद्ध लोक वस्तुस्थिती समजून न घेता यावर आपापल्या दृष्टीकोनातून लेखन करून दरवेळेप्रमाणे गोंधळ निर्माण करीत आहेत. बौध्दांची जनगणना हा मुद्दा बौद्धांची भारतातील एकंदर लोकसंख्या आणि अनुसूचित जातींचे राजकीय व शासन प्रशासनातील प्रतिनिधित्व, बजेट मधील वाटा इत्यादी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर दीर्घकालीन परिणाम कर...