Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ( धर्मांतर , धर्मांतराची भीम गर्जना, व नंतरचे वादळ... !!)

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (धर्मांतराची भीम गर्जना) अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना सामाजीक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधितरी अस्पृश्यांबद्दल सदभावना जागॄत होईल या आयेशी ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या मांजरापेक्शाही खालच्या दर्जाची वाट्ली. याचा एकंदरी परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीत मिसळला. याच दरम्यान जेंव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामूळे त्यानी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फत हा झगडा सतत पाच वर्ष केला. तिकडे  गोलमेज परिषदेच्या माध्यामातून जमेल तितकं अस्पृश्यांसाठी खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण ना...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर-(मणिभवन येथे गांधीशी भेट) व त्यांची गांधीजी बद्दलची ठोस मते...!!!

Image
1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर -(मणिभवन येथे गांधीशी भेट) जुलै १९३१ मधे सरकारनी गोलमेज परिषद (दुसरी) साठी निवडलेल्या प्रतिनिधींची नावे जाहीर केली. पहिल्या गोलमेजमध्ये मर्दुमकी गाजवून सा-या जगाला गदागदा हालवून सोडणा-या निर्भेड व बाणेदार व्यक्तीमत्व, म्हणजेच बाबासाहेबांचे नाव त्या यादीत होते. सप्रू, जयकर, सेटलवाड, मालवीय, सरोजिनी नायडू, मिर्झा इस्माईल, जीना, रामस्वामी मुदलियार अशा एकसे बढकर एक दिग्गजांची दुस-या गोलमेजसाठी निवड झाली होती. ह्या वेळी नुसती परिषद नव्हती तर या परिषदेत भावी हिंदुस्थानाची घटना बनविण्याचे प्राथमिक स्वरुपाचे काम करण्याचे ठरले होते. बाबासाहेबांची मागच्या वेळेस या समितीवर निवड झाली नव्हती. त्यांचा बाणेदारपणा व देशप्रेमाने झपाटलेल्या छटा गो-या साहेबांच्या राष्ट्रिय बाण्याला खोलवर झोंबल्या होत्या. तरी या वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेपुढे शरणागती पत्कारून घटना समितीवर निवड करावी लागली. या निवडीमुळे बाबासाहेबांवर देशाच्या कानाकोप-यातुन अभिनंदनाचा वर्षाव झाला. तिकडे ब्रिटनमधील लोकानीसुध्दा बाबासाहेबांच्या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले. उभ्या भारतात जिकडे तिकडे अभि...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय हे नाव का दिले..??

Image
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाचं जवळच नातं...मिलींद महाविद्यालय आहे. तर मिलींद महाविद्यालय नाव  कसे पडले हे जाणून घेवू... डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या महाविद्यालयाला मिलींद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक  बॅक्ट्रीयाचा ग्रिक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल गर्व होता.त्याला असे वाटत होते की, ग्रिक सारखे विद्दवान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. आपल्या बुध्दिमत्तेचा गर्व चढला होता.तो सर्वांना वादविवादाने आव्हाण देत असे.म्हणुण त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की, आपण एकदा बौध्द भिक्खु बरोबर  वादविवाद करावा. पण त्याचबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. तसा मिलींद काही फार तत्वज्ञानी नव्हता. किवा गाढ विद्वान ही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवायचा हे माहीत होते. आशा मिलींद बरोबर बुध्दीवाद करण्यास कोणीही तयार  होईना.याची बौध्दाना लाज वाटू लागली. व वाईटही वाटले.नंतर महाण प्रयासाने त्यांनी 'नागसेन' भिख्कुला तयार केले.मिलींदचे आव्हान आपण स्विकारले पाहिजे असा नागसेनाने निश्चित केला.मग त्याबाबत यश...