Posts

Showing posts from August, 2026

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान,व त्यांचे महत्वपूर्ण विचार... !!

Image
1] डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान...!! भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्याकाळी प्रत्येक भारतीयाने आपल्यापरीने योगदान दिलं आहे.काहींनी रक्त सांडून,काहींनी जेलमध्ये जाऊन काहींनी सशस्त्र लढा देऊन तर काहींनी राजकीय पातळीवर लढा देऊन आपलं योगदान दिलेलं आहे.  योगदान देणारा आंदोलनात झेंडा घेऊन चालणारा असो नाहीतर आंदोलनाचे नेतृत्व करणारा पुढारी असो, दोघेही समान महत्वाचे असतात आणि आहेत.त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही.  दोन देशात युद्ध होतं तेव्हा दोन्ही देशातील डिप्लोमॅट चर्चेसाठी पुढे येतात, गोलमेज परिषद याचसाठी आयोजित केली गेली होती. तिचा अभ्यास केला पाहिजे,या परिषदेत भारतातील सर्व घटकांचे सर्व धर्मीय पुढारी उपस्थित होते. महात्मा गांधी हिंदूंचे नेते म्हणून तत्कालीन अस्पृश्य दलित वर्गांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुस्लिमांचे नेते म्हणून सर मुहम्मद झफरुल्ला खान उपस्थित होते...आरएसएस कडून कुणीही नव्हतं हे विशेष आहे.यात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे स्वातंत्र्य मागणारे अन त्यासाठी आग्रही असणारेच लोक होते. १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्ध...