डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान,व त्यांचे महत्वपूर्ण विचार... !!




1] डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान...!!

भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्याकाळी प्रत्येक भारतीयाने आपल्यापरीने योगदान दिलं आहे.काहींनी रक्त सांडून,काहींनी जेलमध्ये जाऊन काहींनी सशस्त्र लढा देऊन तर काहींनी राजकीय पातळीवर लढा देऊन आपलं योगदान दिलेलं आहे. 

योगदान देणारा आंदोलनात झेंडा घेऊन चालणारा असो नाहीतर आंदोलनाचे नेतृत्व करणारा पुढारी असो, दोघेही समान महत्वाचे असतात आणि आहेत.त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही. 

दोन देशात युद्ध होतं तेव्हा दोन्ही देशातील डिप्लोमॅट चर्चेसाठी पुढे येतात, गोलमेज परिषद याचसाठी आयोजित केली गेली होती. तिचा अभ्यास केला पाहिजे,या परिषदेत भारतातील सर्व घटकांचे सर्व धर्मीय पुढारी उपस्थित होते. महात्मा गांधी हिंदूंचे नेते म्हणून तत्कालीन अस्पृश्य दलित वर्गांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुस्लिमांचे नेते म्हणून सर मुहम्मद झफरुल्ला खान उपस्थित होते...आरएसएस कडून कुणीही नव्हतं हे विशेष आहे.यात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे स्वातंत्र्य मागणारे अन त्यासाठी आग्रही असणारेच लोक होते.

१४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते... डॉ. आंबेडकर एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढत होते,एक त्यांना ब्रिटिशांकडून भारत स्वतंत्र करून हवा होता अन दुसरे तथाकथित उच्च जातीय हिंदूंकडून तत्कालीन अस्पृश्य दलितांना स्वातंत्र्य मिळवायचे होते,या दोन्ही आघाड्यांवर बाबासाहेब लढत होते.त्याकाळातील मुंबईतील 'बॉम्बे क्रॉनिकल' (Bombay Chronicle) या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटलं होतं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेतच ब्रिटिशांनी भारत सोडून जावं आणि भारताला स्वातंत्र्य बहाल करावं असं ठामपणे मांडलं होतं,तेही त्यांच्याच देशात,त्यांनी ब्रिटीशांना माफीनामा देत पेन्शन मिळवून मी ब्रिटिशांच्या विरोधात कोणतेही कार्य करणार नाही असं लिहून दिलं नाही.त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य मागीतलं होतं.तुम्ही तुमच्या विभागातील नगरसेवकाला एखादी गोष्ट मागणी करून बघा,जमतेय का? इथं तर बाबासाहेब देश स्वतंत्र झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. काही मनुवादी गटारकिडे मुद्दाम संभ्रम निर्माण करतात,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करतात,मात्र वस्तुस्थिती अन इतिहास हा आहे...

जालियनवाला बाग हत्याकांड भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित क्रूर असं सर्वात मोठं हत्याकांड मानलं जातं,यात बहुतांश शहीद झालेले दलित लोक आहेत,आणि त्यांच्या हत्येचा बदला घेणारा शहीदे आझम उधम सिंग यांची माहिती घ्या,(मी इथं सांगणार नाही,कारण स्वातंत्र्य सैनिक हे देशासाठी लढले शहीद झाले.) अन मग आपली जीभ वळवळा
'सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, 
किसी के बाप का भारत थोड़ी है',

जयभीम जय भारत जय संविधान 
- Milind Dhumale...✍️💞
----------------------------------------------------------------------------------


2]  नवीन आलेले व्हाईसराय लॉर्ड माउंटबेटन यांनी ३ जून १९४७ ला एक योजना जाहीर केली. तीमध्ये फाळणीची बीजें स्पष्टपणे रुजलेली होती. या संधीचा फायदा घेऊन काही संस्थानिकांनी आपण स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ ब्रिटीश पार्लमेंट ने १५ जुलै १९४७ ला भारताचा स्वतंत्र कायदा पास केला आणि बरोबर एका महिन्याने १४ ओगस्ट १९४७ ला रात्रौ बारा नंतर भारताला स्वराज्याचे दान करण्यात आले,त्याच बरोबर पाकिस्थानचाही जन्म झाला. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीनंतर भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी सत्ताग्रहण करून आपले सरकार बनविले. कॉंग्रेस व्यतिरिक्त बाहेरच्या प्रमुख व्यक्तींचाही त्यांनी मंत्रिमंडळात समावेश केला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदामंत्री झाले. 

नेहरूंनी मंत्रिमंडळाची निवड योग्य केली. सरकारशी आणि कॉंग्रेसशी दोन हात करणारे बाबासाहेब त्यांचे सहकारी बनले.
समाजात नेहमी दोन प्रवृत्तीचे लोक असतात,दुसऱ्याचे काहीही होवो माझे कल्याण झाले पुरे; हा पहिला प्रकार. आपल्याबरोबर दुसऱ्याचेही हित साधले गेले पाहिजे;त्याचा आनंद तो काही प्रमाणात आपलाही आनंद आहे,असे मानणारा दुसरा प्रकार. वेळप्रसंगी स्वत:च्या मतास मुरड घालून सार्वजनिक जीवन सुरक्षित होत असले तर त्याग करण्याची व पडेल ते कष्ट उचलण्याची अशा लोकांची तयारी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वर्गात मोडतात. त्यांनी आपला विरोध बाजूला सारून मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून काम करायचे मान्य केले. आपल्या हट्टी धोरणाने ब्यारीस्टर जीनांनी आपले इच्छित साध्य केले. ब्रिटीश पार्लमेंट व मोठ मोठे मुत्सद्धि, बाबासाहेबांची योग्यता ओळखून होते. 

बाबासाहेबांनी आपला हेका तसाच चालू ठेवला असता तर त्यांचीही मागणी ब्रिटीश पार्लमेंटला डावलता आली नसती. हिंदू समाज आणि कॉंग्रेसवर सुडच घ्यायचा असता, तर त्यांनी तेही केले असते. पण बाबासाहेब हाडाचेच दयाळू असल्यामुळे त्यांनी पुणे-कराराच्या वेळी असामन्य त्याग करून गांधींचे प्राण वाचविले आणि आपल्या मतास मुरड घालून स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदेमंत्री बनले.

मंत्री बनून मानाच्या खुर्च्या पटकावणे हे फारसे कठीण नाही. दुसऱ्याचा ओंजळीने पाणी पिउन व आपल्या जमातीच्या हितावर विस्तव ठेऊन मंत्रिपदे भूषविणारे हरीचे लाल शेकड्यांनी मिळतील, पण बाबासाहेबांचा पिंड परप्रत्ययनेय बुद्धीचा मुळचा नव्हता, म्हणून त्यांनी आपल्या जमातीचे हित साधूनही भारताची सेवा स्वाभिमानाने करता येते,हे प्रत्यक्ष उदाहरणाने दाखवून दिले.

सं/ले. - विवेक घाटविलकर...✍️
--------------------------------------------------------------------
---------------------


3] डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पहील्यांदा भारतीय स्वातंत्र्याची मागणी केली...!!

नोव्हेंबर १९३० चा काळ आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत (२० नोव्हेंबर १९३०) भारताच्या स्वातंत्र्याची आणि जबाबदार लोकशाही शासनाची ठाम मागणी केली होती....

परिषदेत ब्रिटिशांना सुनावताना बाबासाहेब म्हणाले होते:
> "तुम्ही आमचे मालक बनण्यासाठी उत्सुक असालही, पण आम्ही तुमचे गुलाम बनण्यास मुळीच तयार नाही. तुम्ही भारतावर राज्य करावे ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आहे. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी स्वातंत्र्यासाठी आणि हक्कांसाठी लढत राहीन."

बाबासाहेबांच्या या ओजस्वी आणि तर्कशुद्ध भाषणामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी 'लंडन टाईम्स' या प्रसिद्ध वृत्तपत्राने डॉ. आंबेडकरांच्या या भाषणाची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली.

पहिल्या गोलमेज परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भेट महात्मा गांधींशी झाली. या संवादादरम्यान डॉ. आंबेडकरांचे विचार आणि देशप्रेमाची तळमळ पाहून गांधीजींनी, "आंबेडकर, तुम्ही खरोखरच एक सच्चे देशप्रेमी आहात," अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले होते.

इंग्रजांपुढे दलितांच्या हक्कांसोबतच संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची मागणी अत्यंत ठामपणे मांडणारे पहिले प्रमुख भारतीय नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय...

– राज कांबळे...✍️💞
---------------------------------------------------------------------------------------


4] स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा,नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. 

लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर,आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत की, जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही....--

-विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...✍️📚 
【Ref-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६】
----------------------------------------------------------------------------------------


5]  ‘The governing class in India has no such intention of making any sacrifice on the altar of Indian Freedom. Instead of surrendering its privileges in the name of nationalism, the governing class in India is using or misusing the slogan of nationalism to maintain its privileges. 

Whenever the servile classes ask for reservations in the Legislatures, in the Executive and in public
services, the governing class raises the cry of ‘nationalism in danger.’ People are told that if we are to achieve national freedom, we must maintain national unity, that all questions regarding reservations in the Legislatures, Executives and the public services are inimical to national unity and therefore for anyone interested in national freedom it is a sin to stand out for such reservations and create dissensions. 

That is the attitude of the governing class. It stands in glaring contrast with that of the governing class in Japan. Far from sacrificing its privileges for nationalism, it is exploiting nationalism to preserve them. The governing class in India does not merely refuse to surrender its power and authority; it never loses an opportunity to pour ridicule on the political demands of the servile classes.’

- Dr Babasaheb Ambedkar...✍️📚
【Ref:vol 9, BAWS.】
थँक्स- Gaurav Somwanshi
----------------------------------------------------------------------------------------


6] Independence means nothing more than that a nation has liberty to determine its form of government and its social order without dictation from outside. The worth of independence depends upon the kind of government and the kind of society that is built up. There is not much value in independence if the form of government and the order of society are to be those against which the world is fighting today...


-Vishwratna.Dr.Babasaheb Ambedkar...✍️📚【Ref:Babasaheb Ambedkar Writings and Speeches. Volume 10. pg. 41】
---------------------------------------------------------------------------------------


7] ☆... लोकशाही स्वातंञ्याबद्दल बोलताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...☆" एक स्वतंञ माणूस म्हणजे असा एक माणूस की जो कितीही लहान किंवा महान असेल. जो असल्या तसल्या विभूतीच्या पायावर आपले स्वातंञ्य अर्पण करित नाही. स्वतंञ बुध्दीने विचार करतो आणि स्वतंञ बुध्दीने जगत असतो तोच खरा स्वातंञ्यात आहे असे मी म्हणेन..."...
★स्वतंत्रदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा★
------------------------------------------------------------------------








Comments

Popular posts from this blog

शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी... व शाहू महाराजांच्या जीवनातील त्यांची ठोस कामे...!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान....व हिंदू कोड बिल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर....!