दलित्त्वला(dalitality) नाकारणारे राजा ढाले सर...!!!



दलित्त्वला(dalitality) नाकारणारे राजा ढाले सरांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट...


जात दलित हे ब्राह्मणी academia/NGO ने उभ केलेलं मार्केट हे आजच नाही. जस ह्या पूर्वी गांधी सुद्धा जातीचा प्रश्न म्हणजे "हरिजन" अशी क्लृप्ती करून अस्पृश्यांसाठी काही तरी करुया ह्या अविर्भावात ह्या एकूण संरचनीय शोषण व्यवस्थेला clean chit देतात.

जात हा पूर्ण स्ट्रक्चर चा प्रश्न आहे. तो केवळ दलितांचा प्रश्न असू शकत नाही. मुळात ब्राह्मणी academia आणि एनजीओ सेक्टर ने जात हा प्रश्न अश्या प्रकारे विकृतपणे casteless discourse च्या अंगाने असा वळवून दलितांच्या माथी मारला आहे. दलित ही संद्या देखील स्थितीदर्शक आहे ती काही जैविक ओळख नाही. जैविक ओळख ही माणूस असण्याची असली पाहिजे.पण ते कधी शक्य आहे जेव्हा जातीच पूर्ण निर्मूलन होईल.पण ते जर होणार नसेल तर निदान कुणी जात विरहित असण्याचा आव आणू नये. कारण जात हेच ठरवत सगळं भांडवल, शिक्षण, नोकरी, संपत्ती, सोशल कॅपिटल, स्टेटस, सोशल नेटवर्क, तथाकथित नेपोटिझम.

मग कुठलाही ब्राह्मण किंवा इतर उच्च जातीय सगळ जात भांडवलावर पूर्ण आयुष्य जगून कसा काय casteless/decaste/जात विरहित होऊ शकतो, बर तो होतो तर होतो आणि इतरांना आणि विशेष करून दलित ह्या कॅटेगरी ला जात ह्या प्रश्र्नाशी equate करतो, म्हणजेच जात=दलित अस समीकरण बनवून थियरी बनवायला मोकळा. हेच सुरू आहे सध्या ब्राह्मणी अकॅडमी आणि एनजीओ द्वारे देश विदेशात. त्यामुळे होत अस ब्राह्मण सवर्ण वर्ग जो शोषक आहे त्याला कुणी प्रश्न विचारत नाही आणि उलट शोषित वर्गाला सगळे प्रश्न विचारले जातात.
याचा दुसरा दुष्परिणाम, म्हणजेच जात=दलित या समीकरणा चा दुष्परिणाम म्हणजेच ह्या शिवाय इतर शोषित समूह जसे भटके आदिवासी किंवा इतर मागास जाती आहेत, ह्या इतक्या मोठ्या बहुजन वर्गाचं जातीमुळे होणार शोषण, नुकसान अधोरेखित न होणे.

तर ह्या दलित=जात ह्याच पुढचा टप्पा म्हणजे दलित ही जणू काही वेगळी रेस आहे अस भासवण, मग dalitality (दलितत्व), दलित फूड, दलित कल्चर असल्या संकल्पना जन्माला येतात. आणि मग त्याचा आर्थिक पोटेन्शियल ओळखून एखादी अमेरिकन एनजीओ दलित history month सारखी फालतू संकल्पना पण राबवू पाहते...

- Rahul Gaikwad सर...✍️
--------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी... व शाहू महाराजांच्या जीवनातील त्यांची ठोस कामे...!!!

महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान....व हिंदू कोड बिल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर....!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!