Posts

Showing posts from November, 2026

२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच घटनेचे एकमेव शिल्पकार – ऐतिहासिक पुरावे आणि २५ नोव्हेंबर १९४९ चे ऐतिहासिक भाषण...!!

Image
  1】 लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन सुरक्षित ठेवायचे असेल तर भारतीय संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे... २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात आंबेडकरांनी भारतापुढील ज्या समस्यांचा उहापोह केला आहे, त्याचे स्वरूप आजही बव्हंशी तसेच आहे. आज, 26 नोव्हेंबर. 'संविधान दिन. त्यानिमित्ताने या भाषणाचा हा अंश... माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साध...