Posts

भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...!!!

Image
भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...!  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली, ती केवळ एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून नव्हे, तर तो भारतीय समाजाशी केलेला एक 'नैतिक करार' होता. ही घटना लिहित असताना बाबासाहेबांच्या मनात भारतीय नागरिकांच्या विवेकबुद्धीवर आणि भविष्यातील नैतिक व्यवहारावर गाढ विश्वास होता. त्यांना वाटले होते की, काळानुरूप हे लोक लोकशाही मूल्यांचा स्वीकार करतील आणि आपले वर्तन सुधारतील... १. राज्यघटनेचा 'अपेक्षावाद' आणि आपला प्रतिसाद आपली राज्यघटना केवळ हक्क देत नाही, तर ती आपल्याकडून काही किमान 'मानवीय अपेक्षा' ठेवते. संविधानातील 'मूलभूत कर्तव्ये' आणि 'मार्गदर्शक तत्वे' याचाच आग्रह धरतात. बाबासाहेबांना खात्री होती की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा समाज जातीयतेचा आणि विषमतेचा विळखा सोडून देऊन एकसंध राष्ट्र म्हणून उभा राहील. जर त्यांना हा विश्वास नसता, तर कदाचित त्यांनी शोषित घटकांसाठी वेगळ्या राजकीय वास्तवाचा विचार केला असता. परंतु, त्यांनी देशाच्या ऐक्याला प्राधान्य दिले, कारण त्यांना वाटले होते की 'लोक इतिहासात...

पुस्तकांसाठी घर बांधणारे - पुस्तकप्रेमी ग्रंथप्रेमी बाबासाहेब....!!!

Image
1】 पुस्तकांसाठी घर बांधणारे - पुस्तकप्रेमी ग्रंथप्रेमी  बाबासाहेब....!!!  बाबासाहेब म्हणत, " अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा....!!! बाबासाहेबंशिवाय शिक्षणाचे महत्व जाणणारा या भूमीवर जन्माला न्हवता आणि कदाचित जन्मणार देखील नाही. इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, जॉर्ज पंपन च्या स्वागतासाठी कोणी मुंबईत "गेट-वे ऑफ इंडिया" बांधले शहजाहने आपल्या प्रिय पत्नी मुमताज हिच्या साठी "ताजमहाल" बांधले, राजे महाराजे यांनी विस्तीर्ण वैशिष्ठपूर्ण राजवाडे, शिश महाल, राजमहाल, सोनेरी महाल, तर कुणी मंदिरे मस्जीदी बांधल्या, कोणी सोन्याच्या विटांनी तर कोणी हिरे मानिकांनी मढवलेले सुवर्ण मंदिर अशी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर  बांधतो, मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉ. बाबासाह...

इतिहासाची दिवाळखोरी - काल्पनिक चाणक्य...!!!

Image
इतिहासाची दिवाळखोरी - काल्पनिक चाणक्य...!!! शालेय किंवा विद्यापीठीय स्तरावर अनेक वेळा आपण वाचले असेल की धनानंद राजाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्त मोरियाला योग्य ते शिक्षण देऊन, त्याला राज्य स्थापन करून दिले. म्हणजेच चाणक्य हा चंद्रगुप्त मोरियाचा गुरू होता! पुढे असेही लिहिले आहे की चाणक्यामुळे मोरियांची सत्ता वाढली आणि चंद्रगुप्त मोरिय एक दिग्विजयी राजा झाले. अशीही मान्यता आहे की चाणक्य हा सम्राट अशोकांचा देखील गुरू होता! भारतात आमच्या शिवाय इतर कुठलीही संस्कृती श्रेष्ठ नसून, आम्हीच इथले करते धरते आहोत असा समज इथल्या काही लोकांचा आहे! त्यामुळे इतर संस्कृतीतील अनेक संदर्भ "ह्यांनी" हवे तसे बदलले आणि लिहिले देखील. त्याच बरोबर अनेक शतकांचा प्रचार केल्यामुळे लोकांच्या मनात हे "श्रेष्ठत्वाचे" चित्र रंगविले गेले आहे. वर्तमान काळात नवीन संशोधन होत असल्यामुळे, या लोकांनी स्वतःच्या काल्पनिक नायकांचे अथवा संस्कृतीचे ओढून ताणून जे श्रेष्ठत्व दाखविले होते, त्यांचे पितळ आता उघडे पडत आहे! चाणक्य बद्दल जी काही माहिती मिळते ती त्याने लिहिलेली...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'ब्राह्मण' शिक्षकाने आडनाव दिले, हा एक खोटा आणी खोडसाळ प्रचार...!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'ब्राह्मण' शिक्षकाने आडनाव दिले, हा एक खोटा आणी खोडसाळ प्रचार...!! गेल्या अनेक दशकांपासून एक कथा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे की, भीमराव रामजी सकपाळ यांना 'आंबेडकर' हे आडनाव त्यांच्या एका ब्राह्मण शिक्षकाने स्वतःचे आडनाव देऊन लावले. परंतु, जेव्हा आपण इतिहासाची पाने उलटतो आणि अधिकृत चरित्रकारांचे संदर्भ तपासतो, तेव्हा हे स्पष्ट होते की हा केवळ एक बनावट आणि खोडसाळ प्रचार आहे... १. अधिकृत चरित्रकारांचा पुरावा (खैरमोडे आणि कांबळे खंड) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर सर्वात अधिकृत आणि सखोल लेखन करणाऱ्या दोन महान व्यक्तींचे संदर्भ आपण तपासले पाहिजेत:   * चांगदेव खैरमोडे (खंड १ ते १२): खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक बारीक तपशील अत्यंत कष्टपूर्वक गोळा केला. त्यांच्या १२ खंडांच्या अथांग लेखनात कुठेही असा ठोस उल्लेख नाही की एखाद्या शिक्षकाने त्यांना स्वतःचे आडनाव दिले.   * अ‍ॅड. बी. सी. कांबळे (समग्र आंबेडकर चरित्र खंड १ ते २४): कांबळे यांनी २४ खंडांमध्ये बाबासाहेबांचा इतिहास मांडला आहे. त्यांनी पुराव्यांसह सिद्ध केले आहे की ही ...

रिडल्सचा लढा: जेव्हा आंबेडकरी प्रज्ञेने सनातनी पांडित्याचा गर्व उतरवला...!!!

Image
रिडल्सचा लढा: जेव्हा आंबेडकरी प्रज्ञेने सनातनी पांडित्याचा गर्व उतरवला...!!!                                                                       भारतीय लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या इतिहासात १९८७-८८ चा 'रिडल्स' (Riddles) लढा हे एक अभूतपूर्व पर्व होते. हा केवळ रस्त्यावरचा संघर्ष नव्हता, तर तो आंबेडकरी अनुयायांच्या बौद्धिक मक्तेदारीला दिलेले आव्हान आणि त्यातून मिळवलेला देदीप्यमान विजय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीवर घाला घालणाऱ्यांना ज्या सप्रमाण (With References) पद्धतीने उत्तर दिले गेले, तो इतिहास आजही प्रत्येक अभ्यासकासाठी प्रेरणादायी आहे. १. वादाची पार्श्वभूमी आणि वैचारिक संघर्ष महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे खंड प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले होते. जेव्हा 'रायटिंग्ज अँड स्पीचेस'चा ४ था खंड प्रसिद्ध झाला, तेव्हा त्यातील 'रिडल्स इन हिंदुइझम' या ग्रंथातील 'र...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण व त्याबद्दल त्यांचे सखोल विचार...!!!

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण विचार.......! आरक्षण म्ह़टले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलेच जाते. पण या आरक्षणबाबात बाबासाहेबांचे नक्की काय विचार होते. ते समजून घेऊया त्यांच्याच शब्दात...... जातीय प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न दोन प्रकारांनी केले जात आहेत. पैकी एक प्रकार म्हणजे भ्याडाने गुंडापुढे योजना सादर करणं व दुसरा म्हणजे गुंडाने नेभळटांना योजना मान्य करावयास लावणं हे होय. जेव्हा जेव्हा एखादी जमात बलवत्तर होत जाते व राजकीयदृष्ट्या फायद्याच्या मागण्यांचा पुरस्कार करते तेव्हा तेव्हा चांगले मत राहण्यासाठी तिला सवलती दिल्या जातात. तिने ज्या गोष्टींची पृच्छा केली आहे, त्याबाबतीत न्याय अन्यायाची पर्वा करण्यात येत नाही किंवा तिच्या अंगच्या चांगुलपणाबद्दलही काही निर्णय देण्यात येत नाही. याचा परिणाम असा होत आहे, की तिच्या मागण्यांना मर्यादा राहत नाही व तिला देण्यात आलेल्या सवलतीलाही काही मर्यादा राहत नाही. स्पृश्यांच्या शिक्षणासाठी आपापल्या वार्षिक बजेटमधून राज्य सरकारांनी व मध्यवर्ती सरकारने एक रक्कम बाजूला काढून ठेवावी अशी घटनेमध्येच तरतूद करण्याची मागणी केली पाहिजे. अ...

बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....!!

Image
बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....! अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास नव्याने खोटा लिहिण्याचा आणि सांगण्याचा खटाटोप मोठ्या अहमहमिकेने अनधिकारी नेते करीत आहेत. कुणी त्यांना 'फॉल्स गॉड' ठरवतो तर कुणी त्यांना निझामाकडून मदत घेतल्याचे सांगतो. यावर कळस असा की, त्यांना बंगालमधून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राज्यसभेत निवडून पाठविल्याचे ठोकून देतो. त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांचा अपमान केल्याने समाधान न झाल्यामुळे, ऐतिहासिक असल्याच्या माध्यमातून त्यांचा इतिहासही डागाळण्याचा अश्लाघ्य उपद्व्याप करण्यापर्यंत बिचाऱ्यांनी मजल मारली. वास्तविक पहाता ऐतिहासिक सत्य वेगळेच आहे. परंतु ते अज्ञातही नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीवर जाण्याचा पक्का इरादा होता. परंतु प्रांतिक विधिमंडळाने घटना समितीवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड करावयाची होती. मुंबई विधिमंडळात डॉ. आंबेडकरांचे पक्षाचे सभासद नव्हते. दलित वर्गास मंत्रिमंडळ व विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करीत होते. हंगामी मं​त्रिमंडळात जोगेंद्रनाथ मंडल आणि जगजीवनराम हे दोन प्रतिनिधी दल...

शेती शेतकरी आणि बाबासाहेब... !!

Image
1】 शेती शेतकरी आणि बाबासाहेब... !! सत्याचे, समर्पण भावाचे, दूरदृष्टीचे, बुद्धिमत्तेचे, मानवतावादी नवविचारांचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रहिताचे आणि सर्व समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील गौरवशाली पर्व आहे.भारतीय अस्मितेचे हे प्रतीक आहे. उपेक्षित समाजासाठी त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. उपेक्षित, वंचित आणि महिलांनाही सामाजिक समतेचे समान हक्क आणि अधिकार मिळायलाच हवेत, यासाठी आपले जीवन समर्पित करणा-या सामाजिक समतेच्या चळवळीचे उद्गाते, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह परिषदेतील जाहीरनामा शोषितांच्या मुक्तीचा आणि सामाजिक समतेच्या कृतिशील विचारांचा मंत्रजागर करणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती भारतासह सा-या जगभरात साजरी होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या समतावादी विचारांचा आणि चळवळीचा मागोवा घेतला जाईल. आज कोणत्याही शाळा, कॉलेजात गेलात आणि बाबासाहेबांबाबत विध्यार्थ्यांना किती माहिती आहे हे विचारले, तर यातले तथ्य आढळून येईल. हीच परिस्थिती अनेक भारतीयांची आ...